पुणे शहरात नामांकित कंपनीचे घरगुती बनावट वस्तूंचा पर्दाफाश; १६ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

भूषण गरुड :पुणे शहरात भारतातील नामांकित कंपनीचे लेबलं वापरत घरगुती वापरण्याच्या बनावट वस्तूं पत्र्याच्या शेडमध्ये तयार करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ३चे पोलिस संतोष शिरसागर व अतुल साठे यांना मिळताच. मिळलेल्या माहितीच्या आधारे कात्रज-कोंढवा रोड, गोकुळ नगर येथील पत्र्याच्या शेडवर पोलिसांनी छापा टाकून एकास अटक करत नामांकित कंपनीचे बनावट तयार केलेला माल व कच्च्या मालाचा साठा असा एकूण १६ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयीत व्यापारी हे मुळचे गुजरात राज्यातील कच्छचे असून ते दोन वर्षापासून गोडाऊन घेऊन हा व्यवसाय करत होते.

भारतातील नामांकित कंपनीचे घरगुती वापराच्या ब्रँडच्या नावाखाली बनावट वस्तू विकणारा व्यापारी हितेश रावरिया (वय- ३०,राहणार. नऱ्हे) याला अटक केली आहे. तर त्याचा मालक रामजी महादेव पटेल (वय- ४२) आणि त्याचे साथिदार फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
भारतातील ब्रँडेड कंपन्यांचा लोगोंचा गैरवापर करून बनावट वस्तू बाजारात विक्री होत असून या वस्तू कात्रज-कोंढवा रोड, गोकुळ नगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर व अतुल साठे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पथकाने संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मालाची पहाणी केली असता भारतातील नामांकीत कंपन्यांचे उत्पादन असणारे पॅराशुट ऑईल,विको टरमरिक क्रीम,व्हील डिटर्जंट पावडर,डेटॉल हॅन्ड वॉश,फेअर अँड लवली क्रीम,हार्पिक लिक्विड,विम,क्लोलीन फ्लोअर क्लीनर,ओडोनील एअर फ्रेशनर या वस्तूसारख्या हुबेहेब बनावट निकृष्ट दर्जाच्या वस्तू आढळून आल्या. या वस्तूना भारतातील नामांकीत कंपनीचे लेबलं लावून त्याची पुणे शहर आणि इतरत्र ठिकाणी विक्री केली जात होती. ग्राहकांना बनावट निकृष्ट दर्जाच्या वस्तू देत ग्राहकांची फसवणूक करून शासनाची फसवणूक तसेच स्वामित्व हक्काचे उल्लंघन केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नामांकित कंपनीचा बनावट तयार केलेला माल व कच्च्या मालाचा साठा जप्त करण्यात आला. असा एकूण १६ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात हितेश रावरीया(वय- ३०, राहणार. नऱ्हे) याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बनावट वस्तू तयार करणारा मालक रामजी महादेव पटेल(वय- ४२) व त्यांचे साथीदार फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सदरची कारवाई,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचने प्रमाणे गुन्हे शाखा युनिट ३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, अतुल साठे, दत्तात्रय गरुड, प्रविण तापकीर, संदिप तळेकर, शकील शेख, मच्छिंद्र वाळके, गजानन एकबोटे, दत्तात्रय गरुड, सुजित पवार यांच्या पथकाने केली.