पुणे शहरात बिबवेवाडी परिसरात गुंडांचा ‘राडा’, तरुणांवर वार करुन ‘दहशत’

- Advertisement -

पुणे : पुणे शहरात बिबवेवाडी परिसरात राडा घातल्याचा प्रकार घडला असून दुसऱ्या गटातील तरुणांबरोबर का राहतो, असा जाब विचारुन टोळक्याने दोघांना धारधार शस्त्राने वार करुन जखमी केले. त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगरमध्ये सोमवारी रात्री साडेआठ वाजता गुंडांनी राडा घातला.बिबवेवाडी पोलिसांनी ६ गुंडांवर गुन्हा दाखल केला आसून सनी जाधव, काळा गाडे, बाळ्या गाडे (तिघे रा. चैत्रबन वसाहत, अप्पर बिबवेवाडी), सनी शिंदे (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी), कुंदन शिंदे (रा़ अप्पर ओटा, बिबवेवाडी), बाव्या पंधेकर (रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी १७ वर्षाच्या युवकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याच्या मित्राच्या वाढदिवसासाठी सोमवारी रात्री साडेआठ वाजता जात असताना अप्पर इंदिरानगर येथील शेवटचा बसस्टॉपजवळ या गुंडांनी त्याला अडविले. ”अतुल जाधव, रणजित सांवत यांच्याबरोबर तु का राहतो. थांब तुला खल्लासच करतो” अशी धमकी देऊन सनी शिंदे व बाव्या पंधेकर याने त्यांच्याकडील शस्त्राने फिर्यादीवर वार करुन त्याला जखमी केले.फिर्यादी याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. भर रस्त्यात सुरु असलेला हा प्रकार पाहून लोक जमा झाले. तेव्हा तेथे जमलेल्या लोकांना हत्यार दाखवून ”कोणाच्या अंगात दम असेल त्यांनी पुढे या त्यांचे तुकडे तुकडेच करतो”, अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. त्यामुळे लोकांनी पुढे येण्याचे धाडस केले नाही. गुंड पळून गेल्यानंतर फिर्यादीच्या साथीदारांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.व पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करत आहे

- Advertisement -