Home गुन्हा पुणे शहरात मद्यधुंद अवस्थेत तरुणांची चारचाकी वाहनांना धडक देत थेट पेट्रोल पंपामध्ये घुसली

पुणे शहरात मद्यधुंद अवस्थेत तरुणांची चारचाकी वाहनांना धडक देत थेट पेट्रोल पंपामध्ये घुसली

0

पुणे शहरात मद्यधुंद अवस्थेत तरुणांची चारचाकी वाहनांना धडक देत थेट पेट्रोल पंपामध्ये घुसली

पुणे शहर सिंहगड रस्ता येथे आनंदनगर भागातून हिंगण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकीने रस्त्यावरील इतर वाहनांना धडक देत पेट्रोल पंपावर डिझेल भरत असलेल्या टँकरला जाऊन धडक दिली. सुदैवाने या अपघात कुठलीही हानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी छत्तीसगड राज्यातील हाेती. मद्यधुंद अवस्थेत  असलेले चार तरूण ही गाडी घेऊन वेगाने हिंगण्याच्या दिशेने येत हाेते. आनंदनगर ते विठ्ठलवाडी दरम्यान अनेक वाहनांना धडक देत, या तरुणांची चारचाकी थेट पेट्रोल पंपामध्ये घुसली.

दरम्यान, तेथील डिझेलच्या एका टँकरला ती जाऊन धडकली. हा टॅकर सुमारे वीस हजार लिटरचा होता. तसेच पंपात नागरिकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होती. मात्र सुदैवाने कुठलीही हानी यावेळी झाली नाही. दरम्यान, नागरिकांनी या चारपैकी दोन तरुणांना पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र यावेळी दोन तरुण पळून गेले.