पुणे शहरासाठी मोठी बातमी, अजित पवारांनी दिले महत्त्वाचे आदेश
पुणे : परवेज शेख , 16 जून : गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे ठप्प झालेलं पुणे शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सर्व दुकानं आणि बाजारापेठा सुरू करण्यात आल्या आहे.
आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कंटेन्मेंट परिसरातील दुकानांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील कंटेंनमेंट परिसरातील 90 टक्के दुकाने उघडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कंटेन्मेंट झोनमधील दुकानं उघडण्यात यावी अशी मागणी व्यापारी संघटनेकडून होत होती.
याबाबत आज अजित पवार यांनी पोलीस, महापालिका आयुक्त आणि व्यापारी महासंघाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुण्यात कंटेन्मेंट झोनमध्ये सुद्धा 90 टक्के दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे.
- Advertisement -