Home शहरे पुणे पुणे शहर पोलीस अंमलदार यांचा त्यांचे कुटूंबियासमवेत पदोन्नती समारंभ

पुणे शहर पोलीस अंमलदार यांचा त्यांचे कुटूंबियासमवेत पदोन्नती समारंभ

0

पुणे:परवेज शेख
शहर पोलीस अंमलदार यांचा त्यांचे कुटूंबियासमवेत पदोन्नती समारंभ दिनांक०१ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत मा.पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम सर यांचे अध्यक्षतेखाली पोलीस नाईक ते सहा.पोलीस फौजदार अशा विविध पदावरपदोन्नती झालेल्या एकुण ८५ पोलीस अंमलदार
यांचा सत्कार समारंभ तसेच मा.पोलीस आयुक्त व
पदोनतीधारक अंमलदार यांचे नातेवाईक यांचे एकत्रित हस्ते पदोन्नतीची फित लावण्याचा विशष कार्यक्रम पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील कॉप्स एक्सलन्स हॉल मध्ये पार पडला..
पोलीस दलातील सेवेचा खडतर प्रवास लक्षता घेता पोलीस शिपाई या पदावर भरती  झालेलापोलीस कर्मचारी त्यांच्या
सेवानृित्ती पर्यंत २४ ते ४७ तास कर्तव्यावर असतो. या काळात
नागरीकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देताना तो सण, उत्सव, कुटुंब तसेच कौटुंबिक क्षणांपासुन दुरच असतो.
मात्र स्वतःच्या पदोन्नतीचा क्षण व आनंद सहकारी, मित्र, नातेवाईक व कुटूंबासमवेत साजरा करण्याची संधी पुणे पोलीस आयुक्तालयातील एकुण ८५ पोलीस कर्मचा-यांनी आज
 यावेळी मा.पोलीस आयुक्त यांचेसमवेत संबंधित कर्मचा-याचे कुटुंबातील आई-वडील, पती-पत्नी, मुलगा अथवा मुलगी यापैकी एकाने पोलीस कर्मचा-याच्या दुस-या खांदयावरील फित अथवा स्टार लावला.गेला व पुणे शहर पोलीस दलामध्ये अशा प्रकारे पोलीस अंमलदार यांना त्यांचे नातेवाईकांचे हस्ते
पदोन्नती फित लावण्याची अनोखी संकल्पना मा.पोलीस आयुक्तडॉ.व्यंकटेशम सर यांनी अंमलात आणलेली आहे. या अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी उपलब्द करून दिल्याबद्दल पोलीस कुटुंबियांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली.
“कार्यक्रम क्षणाचा पण आठवणी जन्मभराची” जतन रहावी या संकल्पनेतुन कार्यक्रमानंतर मा.पोलीस आयुक्त यांनी वरिष्ठ अधिकारी व पदोन्नतीधारक सर्व अंमलदार यांचेसमवेत ग्रुप फोटो


काढले आहेत. सदरवेळी मा.पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम सर यांनी पदोन्नती मिळालेल्या कर्मचा-यांना मार्गदर्शन करून,त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पदोन्नतीबाबत सर्व पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांचे अभिनंदन करून पदोन्नती झालेल्या पोलीस कर्मचारी यांची आता जबाबदारी व पदही
वाढलेले आहे. आपण केलेल्या उत्कृष्ट कर्तव्यातुनच आपणास
दिलेली ही पदोन्नती योग्य आहे हे आपण आपले कर्तव्यातुन जनतेला दाखवुन दयावे असे मत मांडले. सदर कार्यक्रमाचे वेळी सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे. अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त,गुन्हे, श्री.अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त, श्री.बच्चनसिंग, श्री.विरेंद्र
मिश्रा, श्री.संभाजी कदम, श्री.मितेश घट्टे व इतर पोलीस अधिकारी व पदोन्नतीधारक पोलीस अंमलदार कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची पस्तावना श्री.विरेंद्र मिश्रा, पोलीस उप-आयुक्त मुख्यालय, आभारप्रदर्शन
श्री.मितेश घट्टे, पोलीस उप-आयुक्त,विशेष शाखा पुणे शहर तसेच कार्यक्रमाचे आयोजन श्री.कल्याणराय विधाते,सहा.पोलीस आयुक्त पुणे यांनी केले आहे.