Home गुन्हा पुणे : सर्रासपणे चालतात उशिरापर्यंत हॉटेल , यांच्यावर मेहरबानी कोणाची ?

पुणे : सर्रासपणे चालतात उशिरापर्यंत हॉटेल , यांच्यावर मेहरबानी कोणाची ?

0

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात सर्रासपणे रात्री उशिरापर्यंत परमिट रूम बियर बार सुरू असतात .

पुणे शहरात सर्वच अवैद्य धंदे बंद आहेत मग रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेल व परमिट रूम बियर बार यांच्यावर मेहरबानी कोणाची आहे ? असा प्रश्न सहज प्रामाणिकपणे समोर येतो .

जाणून घेऊया काय आहे हा सर्व प्रकार

पुणे पोलिसांकडून होत असलेल्या वारंवार धडक कारवाई करून देखील अशा प्रकारचे अवैधरित्या पुणे शहर व परिसरातील विश्रांतवाडी , दिघी (अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ) असणाऱ्या हॉटेल रात्री अपरात्री परमिट रूम बियर बार हे सर्रासपणे सुरू असतात . हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या हॉटेल चालक-मालक कास विचारले असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की हे सदरील हॉटेल रोज आम्हाला मुख्य मालका कडून रात्री उशिरापर्यंत चालवण्यास सांगण्यात आले आहे. असे म्हणणे हॉटेल समई पॅलेस परमिट रूम बियर बार विश्रांतवाडी याठिकाणी कळाले, तसेच पुढे जाऊन बघता सृष्टी गार्डन व्हेज हे हॉटेल देखील सुरज होते. तदनंतर पुुुढे जाऊन बघाय तर काय हॉटेल किर्ती रेस्टॉरंट अँड बार हे देखील चक्क हॉटेल सुरज .

त्यात रात्रीची हुल्लडबाजी करणारी मुलं हेदेखील रस्त्यावर गर्दी करून होती , मनाला वाटेल तशा वेड्यावाकड्या अशा पद्धतीने रस्त्यावर मोटरसायकली लावून गर्दी करून उभे होते.

यामध्ये विशेष असे की ह्या तिघेही हॉटेल अवघ्या विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पासून दहा मिनिटाच्या अंतरावर आहेत. व विश्रांतवाडी अंकित पोलीस चौकी च्या हाकेच्या अंतरावर आहे.

हा सर्व प्रकार पुणे पोलिस कंट्रोल रूमला क्रमशः वारंवार सांगण्यात आला तरीदेखील उशिरापर्यंत संबंधित हॉटेलवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. एकंदरीत पुणे पोलिसांकडून शहरात होणाऱ्या धडक कारवाईचा वेग आता कमी झालेला आहे असे पाहण्यास मिळाले.

दिघी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेली आळंदी रोड वरील हॉटेल अतिथी परमिट रूम बार फॅमिली रेस्टॉरंट हे देखील बिंदास पणे सुरू होते. दर्शन पोलीस टाइम चे प्रतिनिधी घटनास्थळी असताना बाहेर रस्त्यावरून नाईट पेट्रोलिंग पोलीस बलेरो कार देखील न बघता सुसाट वेगाने निघून गेली. यावरून असे लक्षात येते की सदरील हॉटेल चालक व मालकांवर कुठल्या ना कुठला वरदहस्त ची मेहरबानी असल्याचे दिसून येते . कारण रात्री पावणे दोन वाजेपर्यंत अवैद्य पद्धतीने कोणीही अशा प्रकारचे कृत्य करण्यास हिम्मत करत नाही. तसेच दिघी परिसरात हॉटेल मैत्री व्हेज व नॉनव्हेज व छोट्या-मोठ्या हॉटेल व काही चायनीज हॉटेल हे देखील सुरू होते.

खरंच पुणे पोलिसांकडून सर्व अवैद्य धंद्यांवर धडक कारवाई सुरू होती का ?

कारण हा सर्व प्रकार बघता “कोणावर मेहरबान तर कोणावर नजर तान” असा प्रकार दिसून येत आहे.

सदरील पुणे पोलीस आयुक्तालया चे काम अतिशय उत्कृष्ट व प्रशंसनीय आहे. विश्रांतवाडी परिसरातील सुरू असलेले अवैद्य हॉटेल व्यवसाय या सर्व कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. .!

झालेल्या कारवाई बाबात ची सविस्तर माहिती पुढील बातमीत देण्यात येईल तेव्हा अवश्य वाचा दर्शन पोलीस टाईम क्राईम वृत्त.