Home ताज्या बातम्या पुणे ससून रुग्णालयामध्ये अवयवदान पदयात्रेचा ससूनमध्ये संवाद कार्यक्रम संपन्न

पुणे ससून रुग्णालयामध्ये अवयवदान पदयात्रेचा ससूनमध्ये संवाद कार्यक्रम संपन्न

0

पुणे : पुणे ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये दि २७ जानेवारी २०२०रोजी देहदान व अवयवदान महासंघ नाशिक यांच्या अवयवदान पदयात्रेचे स्वागत प्रभारी अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी केले . ही पदयात्रा नाशिक ते बेळगावी अवयवदानाचे जनजागरण करणार आहे . सुनिल देशपांडे हे यात्रेचे संयोजक व समन्वयक आहेत . त्यांच्यासह शरद दाऊदखानी , अविनाश कुलकर्णी व प्रशांत पागनीस हे या पदयात्रेत सहभागी झाले होते डॉ अजय चंदनवाले , सहसंचालक , वैद्यकीय शिक्षण व संशोधन , मुंबई तथा अधिष्ठाता बै जी . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय , पुणे यांनी असे सांगितले की , ससूनने अवयवदानाच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे . यापूर्वी ससूनतर्फे पुणे शहरामध्ये अवयवदान रॅलीचे आयोजन केले होते व अवयवदानविषयी जनजागृती केली होती . आतापर्यंत ससून रुग्णालयाने १९ किडनी प्रत्यारोपण ब ४ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत . समाजात अजूनही अवयवदानाविषयी जागृती व प्रबोधन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले दि २७ रोजी अवयवदान पदयात्रेचा संवाद कार्यक्रम वै जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय , पुणे येथे संपन्न झाला . यावेळी व्यासपिठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे , उपअधिष्ठाता डॉ . राजेश कार्यकर्ते व डॉ . अंजली पाटील उपस्थित होते . कार्यक्रमात श्री शरद दाऊदखानी यांनी अवयवदानाबद्दल प्रास्ताविक केले व अवयवदान पदयात्रेची माहिती दिली श्री सुनिल देशपांडे यांनी अवयवदानाची सामाजिक बाजू विस्तृतपणे स्पष्ट केली . तसेच त्यांनी अवयवदानाबद्दलचे समज – गैरसमज उपस्थितांना सांगितले . त्याचबरोबर डॉ राजेश कार्यकर्ते यांनी सदर कार्यक्रमाचा समारोप केला . डॉ . सोमनाथ सलगर यांनी सुत्रसंचलन केले . ससूनचे अवयवदान समन्वयक श्री अर्जुन राठोड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .