Home ताज्या बातम्या पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता; मानाचे पाचही गणपती मिरवणुकीत सहभागी

पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता; मानाचे पाचही गणपती मिरवणुकीत सहभागी

0

पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता; मानाचे पाचही गणपती मिरवणुकीत सहभागी

भूषण गरुड
पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) होत आहे. मानाचे पाचही गणपती यंदा प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. श्रींच्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ होईल. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पाचही मंडळांच्या ‘श्रीं’ची आरती झाल्यावर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

शहरात गेले दहा दिवस चैतन्याचा सोहळा रंगला होता. त्याची सांगताही नेहमीप्रमाणे जल्लोषात होणार आहे. त्यासाठी गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक ही नेहमीच दिमाखदार ठरत आली आहे. पारंपरिक वेशभूषेतील महिला, युवतींचे पथक, सनई-चौघड्यांचा निनाद, बॅंडची सुरावट, ढोल-ताशे, भव्य रांगोळी हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल. शहराचे सांस्कृतिक वैभव यानिमित्ताने दिसून येणार आहे. मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मिरवणूक मार्गांवर देखाव्यांचे वैविध्यही पुणेकरांना अनुभवण्यास मिळणार आहे.

विसर्जन घाट
नटेश्‍वर, पांचाळेश्‍वर, संगम, अष्टभुजा, वृद्धेश्‍वर, सिद्धेश्‍वर, नेने घाट, पटवर्धन घाट, बापूचा घाट, लकडीपूल विठ्ठल मंदिर येथील घाट, ठोसरपागा येथील घाट, गरवारे महाविद्यालयनजीकचा घाट, राजाराम पुलाजवळचा घाट, चिमा उद्यान येरवडा येथील घाट, बंडगार्डन येथील घाट, वारजे कर्वेनगर गल्ली क्रमांक १ (नदीकिनारी) दत्तवाडी घाट, औंधगाव येथील घाट.

*वाहतुकीसाठी बंद रस्ते*
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता.

*पथकांतील वादकांसाठी* 
  स्वतःजवळ लिंबू व प्यायच्या पाण्याची बाटली ठेवा 
  खडीसाखर सोबत बाळगा,  कोरडे खाद्यपदार्थ जवळ असावेत
  ढोल वाजविताना दुसऱ्याला लागणार नाही, याची काळजी घ्या
  पावसाची शक्‍यता गृहीत धरून रेनकोट जवळ बाळगा

*पार्किंग येथे करावे*
नदीपात्रालगतचे रस्ते 
गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस 
काँग्रेस भवन ते महापालिकेपर्यंतचा रस्ता 
हमालवाडा पार्किंग, नारायण पेठ

*भाविकांनी अशी घ्यावी काळजी*
दागिने घालून फिरू नये
थंडी, ताप, सर्दी, ॲलर्जी असलेल्यांनी गर्दी टाळावी
संशयास्पद वस्तूबाबत पोलिसांना कळवावे
एकाच ठिकाणी रेंगाळत राहू नये 
चोरांपासून सावध राहावे 
फीडर पोलजवळ उभे राहू नये 
लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीत घेऊन जाणे टाळावे 
गर्दीत नातेवाईक, मित्र-मैत्रिणींची चुकामूक झाल्यास स्वयंसेवक, पोलिसमित्र आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा
व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहावे 
चोऱ्या टाळण्यासाठी घराच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि मगच घराबाहेर पडा

*महत्त्वाचे दूरध्वनी* क्रमांक (रुग्णालये)
ससून : २६१२८०००
कमला नेहरू : २६०५३८४१
पूना हॉस्पिटल  : २४३३१७०६
सह्याद्री : २५४०३०००
भारती : २४३६५८४८
सूर्या सह्याद्री : २५४१३९१८
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय : २५८१२३६३ 

*मदतीसाठीचे दूरध्वनी क्रमांक* 
पोलिस नियंत्रण कक्ष १०० किंवा २६१२२८८०, २६१२६२९६
अग्निशमन दल : १०१
पुणे महापालिका : २६४५१७०७
पिंपरी-चिंचवड महापालिका : २७४२३३३३
पुणे कॅंटोन्मेंट : २६४५२१५९
खडकी कॅंटोन्मेंट : २५८१७५१०

*येथे मिळेल वैद्यकीय मदत* 
फरासखाना पोलिस इमारत, विजय टॉकीज चौक, टिळक चौक, गोखले हॉल (लक्ष्मी रस्ता), नारायण पेठ पोलिस चौकी, केळकर रस्ता, ग्राहकपेठ-टिळक रस्ता, स्वीट होम-कुमठेकर रस्ता, शनी मंदिर-दत्तवाडी रस्ता, आयुर्वेद रसशाळा-कर्वे रस्ता.

*रुग्णवाहिकेची सोय*
मॉडर्न विकास मंडळ (विजय टॉकीज चौक) ९९२३३०३४४५
पुणे विघ्नहर्ता न्यास (पूरम चौक) ८०८७६३९६३२
निरंजन सेवाभावी संस्था (फरासखाना) ८००७८८४४८३
बेलबाग चौक, एसपी कॉलेज चौक, टिळक चौक 

*आपत्कालीन वैद्यकीय मदत* 
डॉ. नंदकुमार बोरसे : ९४२२०३२६९६
डॉ. शंतनू जगदाळे : ९०११९१६६०७
डॉ. व्ही. के. आंबेगावकर : ९४२२५०२०९९
डॉ. सुजाता बरगाले : ७३८५७५४४९९
डॉ. मिलिंद भोई : ९८२२६२१५५६
जयेश कासट  : ८००७८८४४८३ 
डॉ. संदीप बुटाला : ९९२३३०३४४५ 
डॉ. प्रशांत बोऱ्हुडे  : ८००७७७२८८८

*आकाश ढगाळ*
पुणे शहर, परिसरात गुरुवारी (ता. १२) आकाश ढगाळ राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान :-कमाल २७, किमान २२ अंश सेल्सिअस