मुंबई, दि. ३१ : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, उपसचिव ज.जी. वळवी, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी मंत्रालय राज्य संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी पुष्प अर्पण करून वंदन केले. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
0000
- Advertisement -