पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी व आधार प्रमाणीकरण बंधनकारक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी व आधार प्रमाणीकरण बंधनकारक
- Advertisement -


सांगली, दि. 30,(जि.मा.का.): – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे. ती संबंधित बँकांच्या शाखांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. योजनेचा लाभ थेट बँक खात्यात मिळण्यासाठी यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असल्याचे शिराळा तहसीलदार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करण्याची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे:-

१)     शेतकऱ्यांनी केंद्र चालकास आधार क्रमांक किंवा कर्जमुक्ती यादीतील त्यांच्या नावासमोरचा विशिष्ट क्रमांक सादर करावा.

२)      शेतकऱ्याची अॅग्रीस्टॅक नोंदणी झाली नसल्यास प्रथम अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्यात यावी.

३)     आधार प्रमाणीकरण करतेवेळी संगणक पटलावर दिसत असलेला आपला आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक, कर्ज थकीत रक्कमेबाबत खात्री करण्यात यावी.

४)    दिसत असलेली माहिती बरोबर असल्यास Agree व Submit ही प्रक्रीया पूर्ण करुन बायोमेट्रीक पध्दतीने प्रमाणीकरण पूर्ण करावे व पावती प्राप्त करुन घ्यावी.

५)    आधार क्रमांक चुकीचा दर्शविला असल्यास बरोबर आधार क्रमांक टाकून प्रमाणीकरण करुन पावती घ्यावी. म्हणजे आधार क्रमांकात दुरुस्तीबाबतची तक्रार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाखल होईल.

६)    कर्ज रक्कम किंवा कर्ज क्रमांकाबाबत चुकीची माहिती दर्शविण्यात येत असल्यास प्रथम बायोमेट्रीक पध्दतीन प्रमाणीकरण पूर्ण करावे, कर्ज खात्याचे माहितीबाबत असहमती नोंद करुन पावती घ्यावी, म्हणजे याबाबतची तक्रार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाखल होईल.

७)     बोटांचा ठसा वापरुन आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) नोंद होत नसल्यास Unable to authenticate हा पर्याय वापरुन केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरण करावे व पावती द्यावी. म्हणजे याबाबतची तक्रार तहसिलदार यांच्याकडे होईल.

याबाबत काही अडचण आल्यास तहसिलदार शिराळा व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार, शिराळा व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

०००००००



Source link

- Advertisement -