Home शहरे उस्मानाबाद पुण्याचा WANTED उस्मानाबाद पोलिसांनी पकडला

पुण्याचा WANTED उस्मानाबाद पोलिसांनी पकडला

0

उस्मानाबाद : पो.ठा. उमरगा गु.र.क्र. १७२/२०२० भा.दं.वि. कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ या गुन्ह्यात पाहिजे आरोपी- कर्वेनगर पुणे येथील रहिवाशी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा पोलिसांना एका खून प्रकरणात पाहिजे असलेला आरोपी निनाद किसनराव महाडिक वय २५ वर्षे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी ८ जून रोजी तुळजापूर येथून ताब्यात घेतले आहे. उर्वरीत तपासकामी उमरगा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पांडुरंग माने, पोना हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.