Home ताज्या बातम्या पुण्याच्या दोन बहिणींच्या कुटुंबातील 6 जणांची ‘कोरोना’वर मात

पुण्याच्या दोन बहिणींच्या कुटुंबातील 6 जणांची ‘कोरोना’वर मात

पुणे : कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूची लागण झाल्याने (Pune Family Beat Corona) कोणीही घाबरुन जाईल. मात्र, पुण्याच्या दोन बहिणी आणि त्यांच्या कुटुंबांनी मात केली आहे. या बहिणींच्या कुटुंबातील 6 सदस्य हे कोरोनाबाधित होते. मात्र, आता या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ते सर्व आता निरोगी आहेत.

41 वर्षीय एका महिलेला (Pune Family Beat Corona) गेल्या 14 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 5-6 दिवस खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसून आल्याने या अंगणवाडी कार्यकर्ता महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या महिलेची मोठी बहीण ही याच रुग्णलयात परिचारीका म्हणून काम करते. तिने तिच्या लहान बहिणीची काळजी घेतली. तोपर्यंत या महिलेला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालेलं नव्हतं. चार दिवसांनंतर तिचा रिपोर्ट आला, त्यामध्ये ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं. त्यानंतर या महिलेचा पती, मुलगा, बहीण, बहिणीचा पती आणि मुलगी या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.एक बहीण व्हेंटिलेटरवर, दुसरीने संपूर्ण कुटुंब साभाळलं.जेव्हा लहान बहीण व्हेंटिलटरवर होती, तेव्हा तिचं संपूर्ण कुटुंब चिंताग्रस्त होतं. मात्र, मोठ्या बहिणीने न खचता कुटुंबाला आधार दिला. त्यांनी स्वत:सोबतच संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली.