Home गुन्हा पुण्यातली अजब घटना-चक्क सापडली पुणे शहरात ‘हातभट्टी’ दारू

पुण्यातली अजब घटना-चक्क सापडली पुणे शहरात ‘हातभट्टी’ दारू

पुणे : लॉकडाऊनमुळे जीवनाश्यक वस्तू सोडून सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. त्यामुळे नियमित दारु पिणार्‍यांची चांगली पंचाईत झाली आहे. सरकारी दारु बंद झाल्याने सध्या बेकायदेशीर हातभट्टीला चांगलाच डिमांड आला आहे. संपूर्ण बंद व रस्त्यां रस्त्यांवर नाकाबंदी असतानाही शहरात हातभट्टीचा सुळसुळाट कसा झाला, याचे कोडे अनेकांना पडले होते.आज दि ०८ रोजी सलीम चाऊस पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) वानवडी पो . स्टेशन पुणे यांना गोपनीय माहिती मिळाली की संतोष नगर कंजारभट वस्ती महमंदवाडी पुणे येथील एका पत्र्याचे शेडचे बाजुला गावठी हातभट्टी तयार दारु चोरुन लपून विकत आहे अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने पोलीस स्टाफ व दोन पंचासमक्ष जाऊन सदर ठिकाणी छापा टाकला असता दारु विकत घेणारे दोन इसम व दारु विक्री करणारा इसम सागर बिनावत रा . संतोष नगर कंजारभट वस्ती महमंदवाडी पुणे हे पळुन गेले आहेत . सदर ठिकाणची पाहणी केली असता एक १० लीटरच्या पांढऱ्या बकेटमध्ये ०५ लीटर गावठी हातभट्टीची दारु व दोन प्लास्टीकचे ग्लास तसेच शेजारील पत्र्याचे खोलीत ३५ लीटरचे एकुण ०५ काळया रंगाचे व ०५ निळया रंगाचे एकुण १० कॅन त्यामध्ये एकुण ३५० लीटर गावठी दारूने भरलेले मिळून आले . तसेच दारु तयार करण्यासाठी लागणारे ४०० लीटर रसायन मिळून आले आहे . असा एकुण ३७ हजार ३१० रुपयांचा माल ताब्यात घेवून त्यामधुन तपासणीसाठी सॅम्पल घेवून दोन पंचासमक्ष उर्वरीत सर्व माल नष्ट करण्यात आला आहे . सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील साो , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सलीम चाऊस सो , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत जोगदंड , मपोना ९५६१ माळी , पो शि ९९२८ जाधव , पो शि ८७८७ खताळ महंमदवाडी बीट मार्शल पो शि ८७५८ म्हांगरे व पो शि ८७७८ नानगुडे यांनी केली आहे .व पुढील तपास वानवडी पो स्टेशन करीत आहे व असेच प्रकार पुणे शहरात काही झोपडपट्टी एरियामध्ये खुलेआम हातभट्टी दारू विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्यांची गर्दी पाहण्यातही मिळत आहे