Home अश्रेणीबद्ध पुण्यात दत्तवाडी पोलिसांनी केले ३ कोटी ५० लाखांचे हस्तिदंत जप्त

पुण्यात दत्तवाडी पोलिसांनी केले ३ कोटी ५० लाखांचे हस्तिदंत जप्त

पुणे : दत्तवाडी पोलिसांनी बेकायदेशीररित्या हस्तिदंताची विक्री करणाऱ्या चार जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे हस्तिदंत जप्त करण्यात आले. 
आदित्य संदीप खांडगे (वय १९ रा.देहूफाटा) ऋषिकेश हरिश्चंद्र गायकवाड (वय २८रा.विवेकानंद नगर,वाकड,पुणे) अनिकेत चंद्रकांत अष्टेकर (वय२६ रा.नगर- कल्याण रोड,अहमदनगर) आणि अमित अशोक पिस्का (वय २८ रा. सामलवाडा, अहमदनगर )अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे गार्डनजवळ पीएमपी बस स्टॉपवर चार इसम हस्तिदंत विक्री करण्यासाठी येणार आहे.  दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी पो.उप निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना कारवाई करण्याची सूचना दिली. 
वनविभाग पुणे यांना लेखी पत्राने माहिती कळवून दोन पंच बोलावून घेतले.खबर मिळाल्याप्रमाणे वनविभाग चे राउंड ऑफिसर,व पंच आणि पोलीस स्टाफ असे .ल.देशपांडे गार्डन जवळ जाऊन सापळा रचत चार इसमाना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन हस्तिदंत (दात) मिळून आले.त्यांचे प्रत्येकी वजन १)०.८८६ ग्रॅम वजन ३३सेंटीमीटर लांबी, २)०.९९८ ग्रॅम ३५ सेंटीमीटर लांब असे आहे. ह्या हस्तिदंताचे सध्याचे बाजार भाव ३ कोटी ५०लाख असल्याची माहिती दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिली. वरील चार व्यक्तिविरोधात वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार दत्तवाडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ हे करत आहे.