Home शहरे पुणे पुण्यात पूरस्थिती ओसारण्यास सुरुवात

पुण्यात पूरस्थिती ओसारण्यास सुरुवात

0

पुणे : खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यास सुरुवात करण्यात आल्याने सिंहगड रस्ता परिसरातील पाणी ओसारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ तसेच कचरा वाहून आल्याने सोसायट्याचे पार्किंग तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचून अस्वच्छता पसरली आहे. तर गेल्या 42 तासापासून या भागातील वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी चांगलेच हाल झाले. तर पालिकेकडूनही नेहमी पेक्षा कमी वेळ पाणी सोडण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून पाणी घुसलेल्या भागाचे मंगळवारी तहसीलदार कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले.

खडकवासला धरणातून शनिवारी रात्रीपासून सोडण्यात आलेल्या पाण्याने या भागातील 10 सोसायट्यामध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे सुमारे 100 हुन अधिक कुटुंबांनी घर सोडले होते. तर सुमारे 65 हुन अधिक कुटुंबे इमारतीतच आसऱ्याला होती. मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग 39 हजार क्यूसेक करण्यात आल्यानंतर या भागातील सहा ते सात सोसायट्यामधील पाणी ओसारण्यास सुरुवात झाली दुपारी 1 नंतर या भागात जाणारा रस्ता खुला करण्यात आला आहे. द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर या भागात दुपारनंतरही पुराचे पाणी कायम होते.