Home शहरे पुणे पुण्यात पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला, तब्बल २० रुग्णांचे वाचले प्राण

पुण्यात पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला, तब्बल २० रुग्णांचे वाचले प्राण

0
पुण्यात पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला, तब्बल २० रुग्णांचे वाचले प्राण

हायलाइट्स:

  • पुण्यात मोठा अनर्थ टळला.
  • पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा.
  • तब्बल २० रुग्णांचा जीव वाचवण्यात आलं यश.

पुणे : देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णसंख्या अचानक वाढल्याने ऑक्सिजन आणि अन्य सुविधा मिळवणं कठीण झालं आहे. अशातच पुणे शहरातील (Pune City) एका रुग्णालयातही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मोठं संकट निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी (Police) दाखवलेल्या तत्परतेमुळे अनर्थ टळला आहे.

कोथरूड परिसरातील एका रुग्णालयात ऑक्सिजन संपत आला होता. या रुग्णालयात ऑक्सिजनवर तब्बल २० रुग्ण उपचार घेत होते. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनात धाकधूक सुरू झाली. ही बाब कोथरूड पोलिसांना समजताच त्यांनी जवळच्या काही रुग्णालयांतून ऑक्सिजन सिलेंडर आणले. परंतु, यानंतरही काही मिनिटेच ऑक्सिजन पुरवठा सुरू राहणार होता.

कोथरूड पोलिस आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अन्य ठिकाणी चौकशी केली. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर शिवाजीनगर परिसरात ड्युरा सिलेंडर असल्याचे समजले. त्यानुसार एस्कॉर्ट करून तो सिलेंडर आणला. काही मिनिटात ही सर्व हालचाल केल्यामुळे २० रुग्णांचे प्राण वाचले. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

india covid cases : करोनाने स्थिती गंभीर; देशात ३.९२ लाख नवीन रुग्ण आढळले, दिलासादायक बाब म्हणजे ३ लाखांवर रुग्ण बरे

ऑक्सिजन सिलेंडर वेळेत उपलब्ध झालेल्या डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईंनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दरम्यान, काल (शनिवारी) पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरात एक महत्त्वपूर्ण बैठक घेत आरोग्य सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. ‘करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच करोनाबाधित रूग्णांना उपचार सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Source link