Home ताज्या बातम्या पुण्यात बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरु; जाणून घ्या मानाच्या गणपतीची मिरवणुकीचे वेळ

पुण्यात बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरु; जाणून घ्या मानाच्या गणपतीची मिरवणुकीचे वेळ

0

पुण्यात बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरु; जाणून घ्या मानाच्या गणपतीची मिरवणुकीचे वेळ*

पुणे : वैभवशाली गणेशोत्सवास लवकरच सुरवात होत आहे. बाप्पांच्या स्वागतापूर्वी मंडळांचे मंडपांचे व देखावे उभारणीचे पूर्ण होत आले आहेत. घरगुती गणपतींसाठीही लगबग सुरू आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख असलेल्या मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे सोमवारी (ता. 1) वाजत गाजत, सनईच्या स्वरात ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून बाप्पांचे आगमन होणार आहे. 

*मानाचा पहिला : कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ*

मिरवणुकीची वेळ : सकाळी 9.30 वाजता 
मिरवणूक मार्ग : कुंटे चौक- श्री लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-जिजामाता चौक ते उत्सव मंडप 
सहभाग : देवळणकर बंधूंचे नगारावादन, प्रभात बॅंड, श्रीराम व संघर्ष ढोलताशा पथक 
‘श्रीं’ची प्रतिष्ठापना : सकाळी 11.40 वाजता 
हस्ते : सत्संग फाउंडेशनचे संस्थापक, आध्यात्मिक गुरू श्री एम 

*मानाचा दुसरा  :  तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ* 

मिरवणुकीची वेळ : सकाळी 10.30 वाजता 
मिरवणूक मार्ग : केळकर रस्ता, मंदार लॉज-कुंटे चौक, लक्ष्मी रस्ता- गणपती चौक मार्गे उत्सव मंडप 
सहभाग : सतीश आढाव यांचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंड, शिवमुद्रा, तालवाद्य, विष्णूनाद शंख ढोलताशा पथक 
‘श्रीं’ची प्रतिष्ठापना : दुपारी 1 वाजता 
हस्ते : एस. बालन ग्रुपचे पुनीत बालन आणि धारिवाल समूहाच्या जान्हवी धारिवाल 

*मानाचा तिसरा : गुरुजी तालीम मंडळ*

मिरवणुकीची वेळ : सकाळी 9.30 वाजता 
मिरवणूक मार्ग : गणपती चौक- लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक- बुधवार चौक- बेलबाग चौक लक्ष्मी रस्त्याने उत्सव मंडपात 
सहभाग : जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्‍वराज बॅंड, नादब्रह्म, गुरुजी प्रतिष्ठान, गर्जना व येरवडा कारागृहातील कैद्यांचे ढोलपथक 
‘श्रीं’ची प्रतिष्ठापना : दुपारी 12.30 वाजता 
हस्ते : उद्योगपती विशाल व श्‍वेता चोरडिया 

*मानाचा चौथा  : तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ*

मिरवणुकीची वेळ : सकाळी 10 वाजता 
मिरवणूक मार्ग : गणपती चौक- लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक- बेलबाग चौक- लक्ष्मी रस्त्याने उत्सव मंडप 
सहभाग : लोणकर बंधू नगारावादन, वाद्यवृंद, भद्राय व श्री. श्री. रविशंकर शाळेचे ढोल-ताशा पथक 
‘श्रीं’ची प्रतिष्ठापना : दुपारी 12.30 वाजता 
हस्ते : बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले 

*मानाचा पाचवा : केसरी वाडा*

मिरवणुकीची वेळ : सकाळी 10 वाजता 
मिरवणूक मार्ग : नारायण पेठेतील माणिकेश्‍वर विष्णू चौक-उंबऱ्या गणपती चौक-शेडगे विठोबा चौक- माती गणपती मंदिर ते उत्सव मंडप 
सहभाग : बिडवे बंधू सनईवादन, श्रीराम व शिवमुद्रा ढोलताशा पथक 
‘श्रीं’ची प्रतिष्ठापना : सकाळी 11.30 वाजता 
हस्ते : डॉ. दीपक टिळक 

*श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट*

मिरवणुकीची वेळ : सकाळी 8.30 वाजता 
मिरवणूक मार्ग : मुख्य मंदिर – अप्पा बळवंत चौक- शनिपार चौक- टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात 
सहभाग : देवळणकर बंधू चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बॅंड, प्रभात बॅंड, मयूर बॅंड व ढोल ताशा पथक 
‘श्रीं’ची प्रतिष्ठापना : 12.20 
हस्ते : ओम गुरुदेव जंगलीदास महाराज 

*अखिल मंडई मंडळ*

मिरवणुकीची वेळ : सकाळी 9.00 वाजता 
मिरवणूक मार्ग : मुख्य मंदिरापासून बाबू गेनू चौक, रामेश्‍वर चौक, गाडीखाना चौकामार्गे मंडईतून उत्सव मंडपात 
सहभाग : दोन ढोलताशा पथक 
‘श्रीं’ची प्रतिष्ठापना : दुपारी 12. 
हस्ते : भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथा 

*श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट*

मिरवणुकीची वेळ : सकाळी 8.30 वाजता 
मिरवणूक मार्ग : बुधवार चौक – अप्पा बळवंत चौक- महर्षी अण्णासाहेब पटवर्धन चौक ते उत्सव मंडप 
सहभाग : श्रीराम, कलावंत, सामर्थ्य, वाद्यवृंद ढोल पथक 
‘श्रीं’ची प्रतिष्ठापना : सकाळी 11.30 वाजता 
हस्ते : पुनीत बालन, संभाजी भिडे गुरुजी