Home शहरे पुणे पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

0

पुणे : पुन्हा एकदा पुणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. साेसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. संपूर्ण दिवाळी पावसात गेल्यानंतर आता हिवाळ्यातही पाऊस पुणेकरांची पाठ साेडायला तयार नाही. 

संध्याकाळी 6 च्या सुमारास शहरातील पूर्व भागातील उपनगरांमध्ये पावसाने जाेरदार हजेरी लावली. विमाननगर, वडगावशेरी, वाघाेली, धानाेरी या भागांमध्ये मुसळधार पाऊस काेसळत आहे. त्याचबराेबर बिबवेवाडी, काेंढवा परिसरात देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पश्चिम उपनगरांमध्ये देखील जाेरदार पाऊस काेसळत आहे. वारजे- माळवाडी, कर्वेनगर, काेथरुड या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस काेसळत आहे. 

जुलैमध्ये सुरु झालेला पाऊस यंदा थांबण्याचे नाव घेत नाहीये. नाेव्हेंबर महिना सुरु झाला असला तरी पाऊस अद्याप परत गेलेला नाही. सप्टेंबर अखेर पुण्यात झालेल्या पावसाने 20 हून अधिक नागरिकांचा बळी घेतला हाेता. ऑक्टाेबरमध्ये देखील शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी काेसळत राहिल्या. आता नाेव्हेंबरमध्ये देखील शहरात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.