पुण्यात सिगारेटवरुन टपरी चालकाचा खून

- Advertisement -

*पुण्यात सिगारेटवरुन टपरी चालकाचा खून*

पुण्यात सिगारेटवरुन टपरी चालकाचा खून
सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर टपरी चालकाच्या पोटात कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात बाणेर रस्ता परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. संतोष कदम (३२) असे खून झालेल्या टपरीचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; बाणेर रस्त्यावरील डी-मार्ट जवळ संतोष कदम यांची टपरी आहे. दरम्यान, रविवारी संध्याकाळी तीनजण या टपरीवर सिगारेट पिण्यासाठी आले होते. त्यातील संतोष यांनी टपरी चालकाकडे सिगारेट मागितली. टपरी चालकांनी संतोष यांना सिगारेट देऊन पैसे मागितले. सिगारेटचे पैसे मागितल्याचा राग आल्याने आरोपीने संतोष कदमला मारहाण केली. तर एकाने कोयत्याने त्याच्या पोटात वार केले. यामध्ये टपरी चालक संतोष गंभीर जखमी झाल्याने त्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -