Home गुन्हा पुण्यानंतर मालाडमध्येही भिंत कोसळली; १२ जणांचा दुर्दैवी मृत्यु

पुण्यानंतर मालाडमध्येही भिंत कोसळली; १२ जणांचा दुर्दैवी मृत्यु

मालाड: पुण्यानंतर आता मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास १३ जखमी झाले आहे.

या घटनेतील सर्व जखमींवर शताब्दी आणि ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आज पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत सहाजण मृत्युमुखी पडले असून चारजण जखमी झाले आहेत.