हायलाइट्स:
- विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचं नातं सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत
- कतरिनाच्या आपार्टमेंटमधून निघताना विकी कौशलचा झाला कॅमेऱ्यात कैद
- सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय विकी कौशलचा व्हिडीओ
इ-टाइम्सनं त्याच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर विकीचा हा व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. ज्यात विकी कौशल आपल्या कारमध्ये असून तो कतरिनाच्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना दिसत आहे. एवढंच नाही तर कतरिनाच्या ड्रायव्हरही यासाठी त्याला मदत करताना दिसत आहे. विकी कौशलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या आधीही जून महिन्याच्या सुरुवातीलाच इ-टाइम्सनं त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर विकी कौशलचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो कतरिना घरी जाताना आणि काही तासांनंतर तिथून बाहेर पडत असताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याच्या या व्हिडीओचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.
दरम्यान अभिनेता हर्षवर्धन कपूरनं विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच अफेअर असल्याचं एका मुलाखतीत कबूल केलं होतं. ज्यामुळे कतरिना हर्षवर्धनवर नाराज असल्याचं बोललं गेलं होतं. कतरिना आणि विकीच्या खासगी आयुष्यावर हर्षवर्धनची अशाप्रकारे कमेंट करणं कतरिनाला आवडलं नसल्याचं बोललं जात आहे.
कामाबद्दल बोलायचं तर कतरिना कैफ आगामी काळात ‘टाइगर 3’, ‘सूर्यवंशी’ आणि ‘फोन भूत’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर विकी कौशलकडे ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’, ‘सरदार उधम सिंह’ आणि फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा बायोपिक हे चित्रपट आहेत.