हायलाइट्स:
- जान्हवी कपूरने शेरा केला ट्रॅव्हल मॅगझीनवरचा फोटो
- नेटकऱ्यांनी ट्रोल करू नये यासाठी फोटोसोबत दिलं कॅप्शन
- स्पष्टीकरण दिलेलं असतानाही जान्हवी झाली ट्रोल
तो छोटा राजन नव्हता ना…नातेवाईकाला मिळाला नाही ICU बेड; सुतापा यांचा संताप
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्रॅव्हल मॅगझीनवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत जान्हवी बिकनी परिधान करून मालदीवच्या निळ्याशार पाण्यात उभी राहिलेली दिसते. तिच्या पाठीमागे मालदीवच्या समुद्राचा सुंदर नजारा दिसत आहे. जान्हवीचा हा फोटो चाहत्यांना पसंत पडला आहे. या फोटोमुळे आपण ट्रोल होऊ नये म्हणून जान्हवीने त्यासोबत कॅप्शन दिलं, ‘हे शूट आधीच ठरलेलं होतं आणि हे फोटो लॉकडाउनपूर्वीच काढले गेले आहेत. आम्ही सुरक्षित होतो आणि सगळी काळजी घेत होतो.’
त्यासोबत जान्हवीने लिहिलं, ‘मी आशा करते की तुम्ही सगळे सुरक्षित आहात आणि स्वतःची काळजी घेताय. हिमतीने परिस्थितीला तोंड देताय.’ ट्रोल न होण्यासाठी कॅप्शन दिलेलं असूनही ऐकतील ते युझर्स कसले. जान्हवीच्या या कॅप्शनवर काही नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे. एका युझरने म्हटलं, ‘तुझ्यासाठी काय गरजेचं आहे? तुझं काम की तुझा देश?’ तर दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘तू देशासाठी काय केलंय, जेव्हा आता देशाला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे.’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘हा फोटो पोस्ट करताना तुला स्पष्टीकरण देण्याची गरज का पडली?’
सुजलेले गुढघे आणि प्रचंड वेदना सहन करत जॅकलीनने पूर्ण केलं ‘दिल दे दिया’