हायलाइट्स:
- अभिनेत्री मंदिरा बेदीने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
- वास्तव स्वीकारत नव्याने सुरुवात करण्याचा व्यक्त केला मानस
- राज कौशल यांच्या निधनानंतर कुटुंबासोबतच आहे मंदिरा
मंदिरा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. परंतु राज यांच्या निधनानंतर ती फारशी सोशल मीडियावर नसते. परंतु अलिकडेच मंदिराने सोशल मीडियावर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून ती स्वतःलाच प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहे. तिने लिहिले आहे, ‘ मी सक्षम आहे… माझ्यात क्षमता आहेत…अनेकजण माझ्यावर प्रेम करतात… मी कणखर आहे… आता नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे…’ असे म्हणत तिने My #dailyaffirmation असा हॅशटॅग दिला आहे.
मंदिराच्याया पोस्टवर तिचे चाहते, तिचे मित्रमंडळी तिला धीर देत आहे. मंदिराच्या या पोस्टवर अर्जुन बिजलानी, तनवी शाह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कॉमेन्ट केल्या आहेत.
दरम्यान, राज कौशल यांच्या जाण्याने एकाकी पडलेली मंदिरा तिचे दुःख कुटुंबियांसोबत राहून कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलिकडेच मंदिराने एक फॅमिली फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती वीर आणि तारा सोबत दिसत आहे. मुलांसोबत तिचे वडील विरेंद्र सिंह बेदी आणि आई गीता बेदी ही दिसत आहेत.
२५ वर्षांचे नाते
राज कौशल यांचे निधन झाल्यानंतर मंदिरा बेदी कोलमडून पडली होती. मंदिरा आणि राज यांनी १४ फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न केले होते. या दोघांच्या लग्नाला जरी २३ वर्षे पूर्ण झाली असली, तरी ते एकमेकांना २५ वर्षांहून अधिक काळ ओळखत होते… त्यांचे २५ वर्षांचे हे नाते खूप सुंदर आणि प्रगल्भ असे होते…