Home मनोरंजन पुन्हा ‘साऊंड.. कॅमेरा.. अॅक्शन… टीव्ही मालिकांच्या शूटिंगसाठी ‘या’ शहराला पसंती

पुन्हा ‘साऊंड.. कॅमेरा.. अॅक्शन… टीव्ही मालिकांच्या शूटिंगसाठी ‘या’ शहराला पसंती

0
पुन्हा  ‘साऊंड.. कॅमेरा.. अॅक्शन… टीव्ही मालिकांच्या शूटिंगसाठी  ‘या’ शहराला पसंती

[ad_1]

मुंबई टाइम्स टीम
राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात राहात असला तरी शूटिंगसाठी त्याला मुंबई गाठावी लागते. त्यातही गोरेगाव, अंधेरी, मढ, दादर, वांद्रे अशा ठरावीक ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेट्स आणि स्टुडिओवर कलाकार आणि तंत्रज्ञांचा मुक्काम असतो. मुंबई हे मनोरंजनसृष्टीचं केंद्रस्थान मानलं जातं. पण, आता गेल्या काही वर्षांत मालिकांसाठीचा हुकुमी एक्का म्हणून ठाणे या शहराकडे पाहिलं जातं. मध्यंतरीच्या काही वर्षांत मालिकांसह अनेक मराठी सिनेमांचं चित्रीकरणदेखील ठाण्यात झालं. अगदी गेल्या वर्षी पहिलं लॉकडाउन संपल्यानंतरही ठाण्यात वेगानं सिनेमांच्या चित्रीकरणाचे काम सुरू होते.

येत्या आठवड्यात पुन्हा एकदा ठाण्यात मराठी मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. तसंच या महिन्याच्या अखेरीस काही सिनेमांच्या चित्रीकरणालादेखील ठाण्यात सुरुवात होणार आहे. मध्यंतरीच्या महिन्यात चित्रीकरणाचे काम अपुरे राहिले असलेल्या सिनेमांचं शेड्युल आता ठाण्यात लागणार असल्याचं कळतंय. ठाणे, पालघर, नवी मुंबई आदी ठिकाणं सध्या ‘लेव्हल २’मध्ये असल्यानं तेथे चित्रीकरणासाठी पूर्ण वेळ परवानगी देण्यात आली आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन निर्मात्यांना चित्रीकरणाचे काम करता येणार आहे.

नाटकांचे प्रयोग?
ठाणे, नवी मुंबईमध्ये चित्रीकरणाचे काम सुरु होतं असलं तरी नाट्यगृहात नाट्यप्रयोग सुरु होण्यासाठी आणखी महिनाभर लागणार असल्याचं बोललं जातंय. प्रयोग आणि निर्मितीचा खर्च मोठा असतो. त्यात सध्या केवळ पन्नास टक्के क्षमतेतच नाट्यगृहात प्रेक्षकांना प्रवेश आहे. त्यामुळे नाट्यगृहापर्यंत कितपत प्रेक्षक येतील याबाबत नाट्यनिर्मात्यांना शंका आहे. परंतु, आगामी दिवसात नाटकांच्या तालमीला ठाणे, नवी मुंबईमधील नाट्यगृहात सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मालिका ठाण्याकडे?
मुंबईत किंवा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चित्रित होणाऱ्या मालिका आपल्या नव्या सेटची उभारणी ठाण्यात करण्याचा बेत आखत असल्याचं कळतंय. मालिकेतील बहुतांश कलाकार ठाणे आणि नजीकच्या परिसरात राहतात. त्यामुळे प्रवास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं ठाणे मालिका निर्मात्यांना सोयीचं ठरत असल्याचं बोललं जातंय.

मुंबईतही परवानगी द्यावी
नजीकच्या जिल्ह्यात पूर्ण वेळ परवानगी आणि मुंबईत वेळेची मर्यादा. असं का? प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या चौकटीत राहून पूर्ण वेळ काम आणि चित्रीकरण करण्याची परवानगी राज्य सरकारने मुंबईत द्यायला हवी. कलाकार, तंत्रज्ञ आणि सेटवर रोजगारावर असलेल्या कामगारांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव आहे.
– अमेय खोपकर, निर्माता

प्रारंभ महत्त्वाचा
टीव्ही-सिनेमा विश्वातील प्रतिनिधी, कलाकार, तंत्रज्ञांनी राज्य सरकारशी बातचीत करुन आजच्या कठीण काळात काम करण्यासाठीचा मार्ग शोधला. त्यादृष्टीनं ते आपलं कामकाज करत आहेत. ठाणे, पालघर विभागात जिल्हाधिकाऱ्यांनी तळागाळाची परिस्थिती जाणून घेऊन आता चित्रीकरणासाठी पूर्ण वेळ परवानगी दिली आहे. मुंबईत देखील शासनाच्या अध्यादेशात बायो-बबलमध्ये काम करण्याची परवानगी आहे. त्यामुळे आता चित्रीकरणाच्या कामाला राज्यात प्रारंभ होतोय; हे महत्त्वाचं.
– आदेश बांदेकर, अभिनेते/ निर्माते

[ad_2]

Source link