Home बातम्या पुरात वाहून गेलेल्या जनावरांचा राज्य सरकार देणार मोबदला : महादेव जानकर

पुरात वाहून गेलेल्या जनावरांचा राज्य सरकार देणार मोबदला : महादेव जानकर

0

मुंबई : गेल्या पाच सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. तसेच पशुधनाचेही नुकसान झाले . त्यामुळे पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी सरकारने अजून एक घोषणा केली आहे. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी पुरात जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल,अशी माहिती दिली .

‘पुरात वाहून गेलेल्या मोठ्या जनावराच्या मोबदल्यात ३० हजार रुपये, तर लहान जनावराच्या मोबदल्यात १६ हजार रुपये तर शेळी – मेंढीसाठी ३ हजार रुपये राज्य शासनातर्फे देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले . पूरग्रस्त भागातील सर्व जनावरांवर मोफत उपचारासोबतच औषधं, लसीकरणही विनामोबदला देण्यात येणार आहे .

दरम्यान पूरपरिस्थितीशी नागरिकांचे संघर्ष सामना असतानाच सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. विविध यंत्रणांनी या दोन्ही जिल्ह्य़ातून दोन लाखांहून अधिक नागरिक आणि २२ हजार जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. एनडीआरएफ, नौदल, लष्कर आणि तटरक्षक दल यांच्या विविध पथकांद्वारे मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे.