मुंबई:’देवमाणूस‘ या मालिकेची चर्चा थांबायचं नाव घेत नाहीए. मालिकेत ट्विस्टवर ट्विस्ट येत आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजितला अटक करत, त्याला फरफटत पोलीस ठाण्याच्या दिशेने वरात काढली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याची केस सुरू आहे आणि सरकारी वकील आर्या यांच्या विरुद्ध तो स्वतःची केस स्वतः लढतोय.
नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये न्यायाधीश देविसिंगची पुराव्यांअभावी सुटका करण्यात येत असल्याचं सांगतात. इतक्यात देवीसिंगला खिडकीबाहेर एक बाई दिसते,अन् तो चक्कर येऊन खाली कोसळतो..असं दाखवण्यात आलं आहे.
या प्रोमोध्ये दाखवण्यात आलेली बाई नक्की कोण? आणि देवसींगसोबत तिचं काय नातं आहे? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेली ही अभिनेत्री माधुरी पवार असून तिच्या एन्ट्रीमुळं मालिकेत वेगळं वळण येणार असं दिसतंय.
- Advertisement -