Home शहरे कोल्हापूर पूरग्रस्तांना कलावंत, दगडूशेठ ट्रस्टची मदत

पूरग्रस्तांना कलावंत, दगडूशेठ ट्रस्टची मदत

0

पुणे : प्रतिनिधी काेल्हापूर, सांगली परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकारांनी पुढाकार घेतला अाहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातून सुमारे १६ ट्रक साहित्याची जमवाजमव करून ते शुक्रवारी पूरग्रस्त भागात रवाना करण्यात अाले. अभिनेता प्रवीण तरडे, मेघराज भाेसले, संताेष जुवेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बाेलताना ही माहिती दिली. 
अभिनेते तरडे म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अाणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्यामार्फत चित्रपट, नाट्य कलाकारांना मदतीचे अावाहन करण्यात अाले हाेते अाणि त्याकरिता विनाेद सातव यांनी पुढाकार घेतला. अभिनेता सुबाेध भावे, रवी जाधव, रत्नाकांत जगताप, कुशल बद्रिगे, सर्इ ताम्हणकर, प्रिया बापट यांनीही याकरिता काम केले. दिग्दर्शक अभिजित भाेसले यांनी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी दाेन ते अडीच टन खाद्यपदार्थ गाेळा केले अाहेत. चित्रपट महामंडळाचे राज्यभरात ४५ हजार, तर नाट्य महामंडळाचे २५ हजार सदस्य अाहेत. अनेक शाखांच्या माध्यमातून कलाकारांनी मागील अाठवडाभर काम केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे एक गाव उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे उत्सवप्रमुख नगरसेवक हेमंत रासने यांनी सांगितले. सारस्वत बँकेतर्फे एक कोटी रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे देण्यात अाला. 
शरद पवारांचे पूरग्रस्तांसाेबत झेंडावंदन अाणि रक्षाबंधन 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पूरग्रस्त काेल्हापूरचा दाैरा करून तेथील नुकसानीची माहिती घेतली. या पूरग्रस्तांसाेबतच त्यांनी झेंडावंदन केले. मुस्लिम बोर्डिंग, नेहरू हायस्कूल येथे अाश्रयास असलेल्या पूरग्रस्तांची त्यांनी भेट घेतली.