Home गुन्हा पूर्ववैमनस्यातून एकाचा खून दोघां विरुद्ध गुन्हा दाखल जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील घटना

पूर्ववैमनस्यातून एकाचा खून दोघां विरुद्ध गुन्हा दाखल जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील घटना

जिंतूर (प्रतिनिधी):मोठ्या भावाचे दुसरे लग्न लावून देण्यास मदत करणाऱ्या लहान भावाचा पूर्ववैमनस्यातून पुतण्याने व त्याच्या पत्नीने मिळून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शुक्रवार दिनांक 21 जून रोजी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील येलदरी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर घडली.

 याबाबत अंबादास पावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  दोघा विरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 याबाबत अंबादास पावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की त्यांनी काही वर्षापूर्वी दुसरे लग्न केले होते हे लग्न त्यांचा लहान भाऊ मधुकर पावडे यांनी लावून देण्यात मदत केल्याचा संशय नातेवाईक व इतर भावांमध्ये होता त्यामुळे त्यांच्या कुटुंबात नेहमीच वाद होत असे या वादाला कंटाळून अंबादास पावडे, मधुकर पावडे हे दोघे बंधू काही वर्षांपूर्वी येलदरी सोडून पाथरी येथे राहावयास गेले त्यांची शेती येलदरी पासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिकलागार या गावात आहे दिनांक 20 जून रोजी शेतीतील उसाचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खात्यावर जमा झाल्याचे त्यांना कळाले त्यावरून दोघे भाऊ येलदरी येथे आले रात्री परत जाण्यास उशीर  झाल्याने ते चिखलागार येथे त्यांच्या शेतीचा बटाईदार विठ्ठल चव्हाण यांच्या घरी दोघा भावांनी मुक्काम केला शुक्रवार दि 21 जून रोजी सकाळी विठ्ठल चव्हाण यांचा दुचाकीवर बसून चिखलागार येथून जिंतूर कडे जात असताना पावणे दहा वाजण्याच्या सुमारास येलदरी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर त्यांच्या दुचाकीस पाठीमागून एकनाथ अंबादास पावडे याने आटोने जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार दोघे भाऊ खाली पडले असता एकनाथ पावडे याने हातातील धारदार शस्त्राने मधुकर पावडे यांच्या पोटावर,छातीवर जोरदार वार केले तर पद्माबाई पावडे यांनी अंबादास पावडे यांना जबर मारहाण केली यावेळी इतर नागरिक घटनास्थळी जमा झाल्याने हल्लेखोर एकनाथ पावडे, पद्माबाई पावडे यांनी तेथून पळ काढला गंभीर जखमी झालेल्या मधुकर पावडे  यांच्यावर प्राथमिक येलदरी च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात  उपचार करून पुढील उपचारासाठी दाखल केले असता तिथेच निधन झाले याबाबत अंबादास पावडे यांच्या फिर्यादीवरून एकनाथ पावडे, पद्माबाई पावडे या दोघां विविध जिंतूर पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे