Home शहरे कोल्हापूर पूर ओसरु लागला; शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर 249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील 2 लाख 45 हजार 229 जणांचे स्थलांतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई

पूर ओसरु लागला; शिरोळमधून दीड लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर 249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील 2 लाख 45 हजार 229 जणांचे स्थलांतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई

0

    कोल्हापूर  : पंचगंगेच्या पातळीत कमालीची घट झाल्याने पाणी ओसरु लागले आहे.  आजअखेर एकूण 249 गावांमधून 50 हजार 594 कुटुंबातील 2 लाख 45 हजार 229व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यात शिरोळ तालुक्यातील 42 गावामधून 31 हजार 38 कुटुंबातील 1 लाख 55 हजार 186 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

            तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे – कागल – 35 गावातील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 53 सदस्य, राधानगरी – 17 गावातील 558 कुटुंबातील 3 हजार 40सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा– 22 गावातील 87 कुटुंबातील 333 सदस्य, भुदरगड – 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार 31 सदस्य,शाहुवाडी – 6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा – 28 गावातील 405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, शिरोळ – 42 गावातील 31 हजार 38 कुटुंबातील 1 लाख 55 हजार 186सदस्य, हातकणंगले – 21 गावातील 7 हजार 526 कुटुंबातील 33 हजार 723 सदस्य, करवीर – 35 गावातील 5 हजार 101 कुटुंबातील 26 हजार 433 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.