Home गुन्हा पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह ८ जण अटकेत

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह ८ जण अटकेत

पुणे:- प्रतिनिधी

दि. २९/०५/२०२० रोजी येरवडा कारागृहातून सुटलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीसह हुल्लडबाजी करत रस्त्यावरून निघालेल्या ८ जणांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल ५ जिवंत काडतुसे,तीन फोर व्हीलर कार असा ३३,४०,६००/- रुपये रकमेचा मुद्देमाल हस्तगत करणेत आकेला. आरोपींमध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शुक्रवारी रात्री पौड येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलानी व जमीन मुलानी यांची येरवडा कारागृहातून कॉरोना या संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभूमीवर मा. न्यायालयाने आदेशाने पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना घेण्यासाठी त्यांचे भाऊ नातेवाईक व मित्र पिंपरी-चिंचवड व मोशी भोसरी परिसरातून मोठ्या संख्येने येरवडा कारागृहा बाहेर जमा झाले होते. येरवडा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांने २० ते २५ समर्थक दुचाकी व चारचाकी गाड्यांमधून हुल्लडबाजी करत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोरून चालले होते. त्यावेळी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन बाहेर अधिकारी व कर्मचारी यांच्यासह थांबलो असताना सदरचा हुल्लडबाजी करणारा जमाव थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांचे सूचनांकडे दुर्लक्ष करत हा जमाव आरटीओ फुले नगर दिशेने गेला तात्काळ , अधिकारी व कर्मचारी यांच्यासह त्यांचा पाठलाग केला सदर बेकायदेशीर जमावाने फुले नगर चौकी येरवडा पुणे येथे रस्त्याच्या मधोमध गाड्या लावून रस्ता अडवून बेकायदेशीर गर्दी जमवून तोंडाला कोणतेही मस्कचा वापर न करता मा.जिल्हाधिकारी व मा. मनपा आयुक्त यांनी दिलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २०२०चे कलम ११ यांचा भंग केल्याचे निदर्शनास आले सदर का जमावाकडे चौकशी केली असता त्यांतील एक इसम शरीफ मुलानी याने तो पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे क्राइम ब्रांचचा पोलीस शिपाई असल्याचे सांगितले. त्यांचे सोबत असलेले गाड्यांची तपासणी केली असता. फॉर्च्युनर गाडी नंबर एम एच १४ जे बी००६३ या गाडीचे गिअरबॉक्स मध्ये असलेल्या बॉक्समध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत राऊंड मिळून आले. तसेच स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच १२जे झेड २०५९या गाडीचे मागील सीटच्या खाली एक लोखंडी पाईप मिळून आला व एक काळया रंगाची स्विफ्ट कार तिचा आरटीओ क्रमांक एम एच १२ एच एन ७६०२ ही मिळून आलेने सदरच्या बेकायदेशीर जमाव हा पुढे जाऊन एखाद्या गंभीर गुन्हा करण्याची इराद्याने जात असल्याचे संशय वाटल्याने विश्रांतवाडी पोलीस स्टाफचा मदतीने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भदविक १४३,१४७,१४९,३४१,१८८,२६९,२७० व मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ तसेच भारताचा हत्यार कायदा कलम ३(२५) प्रमाणे तसेच वरील कलमा प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे . आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींची तपास कामी दिनांक ०२/०६/२०२० रोजी पर्यंतची ४ दिवसांची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

सदर कामगिरी मा. सुनील फुलारी, अप्पर पोलीस आयुक्त साहेब पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. पोलीस उप आयुक्त साहेब ,परि.४ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त साहेब खडकी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अरुण आव्हाड , पोनि. गुन्हे रविंद्र कदम, सपोनी संदीप यादव, सापोनी सचिन निकम, पो.उपनिरी लहू सातपुते ,सपोफौ दत्तु हेमाडे,पोहवा दिनकर लोखंडे, पोहवा विजय सावंत, पोना विनायक रामाने, पोना वामन सावंत, पोना प्रवीण भालचिम ,पोना यशवंत किर्वे,पोना किशोर दुशिंग, पोशि अनिकेत भिंगरे,पोशि सोमनाथ खळसोडे,पोशि रिहान पठाण ,पोशि प्रफुल्ल मोरे,पोशि शेखर खराडे,पोशि संदीप देवकाते,पोशि प्रितम जंगम,

तसेच विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे कोरूना १९ चे अनंशंगाने नेमणेत आलेले विशेष पोलीस अधिकारी ( पी – ४ समन्वयक) श्री. राज राठोड , यांनी पार पडलेली आहे.