Home बातम्या महत्वाच्या बातम्या पेट्रोल पंपवर ग्राहकांना या सुविधांचा मोफत घेता येऊ शकतो लाभ….घ्या जाणून

पेट्रोल पंपवर ग्राहकांना या सुविधांचा मोफत घेता येऊ शकतो लाभ….घ्या जाणून

देशातील पेट्रोल पंपवर ग्राहकांसाठी मोफत सुविधा पुरवल्या जातात. मार्केटिंग अनुशासन धोरण अंतर्गत पेटोल पंप चालकांकडून ग्राहकांना या सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी अनिवार्य असते. या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित पेट्रोल चालकांविरोधात कारवाई होऊ शकते. शिवाय संबंधित पेट्रोल मालकाचा पेट्रोल विक्रीचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यामुळे या नियमांचा आणि पेट्रोल पंपवर सामान्यांसाठी कुठल्या सुविधा या मोफत उपलब्ध करुन दिले जातात, यासंबंधित माहिती घ्या जाणून…

1 पेट्रोल पंपवर वाहन चालकांना त्यांच्या गाडीच्या टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा ही मोफत असते. यासाठी पेट्रोल पंप मालकाला हवा भरण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन बसवणे बंधनकारक असते. तर यासाठी त्याला एका व्यक्तीची देखील नियुक्ती करणे बंधनकारक असते. 

2 पेट्रोल पंपवर सर्व सामान्यांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा असते. यासाठी पेट्रोल पंपवर आरो किंवा वॉटर कुलर बसवणे मालकाला बंधनकारक असून यासाठी ग्राहकांकडून पैसे घेणे कायद्याने गुन्हा आहे. 

3 वाहन चालकांसाठी मोफत वॉशरुमची सुविधा देणे देखील पेट्रोल पंप मालकाला अनिवार्य असते. यासाठी सामान्यांना पैसे न भरता वॉशरुमचा वापर करता येऊ शकतो. इतकेच नव्हे तर वॉशरुममध्ये अस्वच्छता असल्यास याची तक्रार सुद्धा ग्राहकांना करता येऊ शकते. 

4 पेट्रोल पंपवर सामान्यांसाठी मोफत कॉलची सुविधा देखील असते. या सुविधेबाबत अनेक लोकांना माहिती नाही. परंतू तुमच्या फोनमध्ये बॅलेन्स नाही, नेटवर्क नाही, आपात्कालीन परिस्थितीत किंवा तुमच्याकडे फोनच नाही, तर तुम्ही पेट्रोल पंपवर जाऊन एक कॉल करु शकतात. 

5 प्रत्येक पेट्रोल पंपवर फर्स्ट एड बॉक्स ठेवणे पेट्रोल पंप चालकाला अनिवार्य असून त्यामध्ये औषधी आणि बँडेज असणे आवशयक आहे. उल्लेखनीय म्हणजे एक्स्पायरी डेट झालेल्या औषधी ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. 

6 आपात्कालीन परिस्थितीत आग लागल्यास पेट्रोल पंपवर फायर सेफ्टी डिवाईस आणि रेतीने भरलेली बादली असणे आवश्यक आहे. जेणेकरुन  पेट्रोल किंवा डिझेल भरताना काही कारणाने आग लागल्यास आगीवर त्वरीत नियंत्रण मिळवता येऊ शकते. 

7 पेट्रोल आणि डिझेल भरल्यानंतर बिल मागण्याचा अधिकार हा प्रत्येक ग्राहकाला असतो, त्यामुळे संबंधित ग्राहक हक्काने बिलाची मागणी पेट्रोल मालकाकडे करु शकतात. यासोबतच प्रत्येक ग्राहकाला तो भरुन घेत असलेल्या इंधनाची क्वालिटी आणि कॉन्टीटी जाणण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी मालकाला विशेष सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक असते. 

8 पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीविषयी ग्राहकांना माहिती करुन देण्यासाठी विशेष सोय केली पाहिजे. जेणेकरुन प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल किंवा डिझेलच्या किंमतीविषयी माहिती होईल आणि अव्वाच्या सव्वा दराने इंधन दराची विक्री होत असल्याच्या प्रकरणावर आळा बसेल. सोबतच पेट्रोल पंपच्या मालकीचे आणि पेट्रोलियम कंपनीचे नाव आणि संपर्क क्रमांकाचे डिस्प्ले करणे मालकाला अनिवार्य आहे. 

9 प्रत्येक पेट्रोल पंपवर तक्रार बॉक्स ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणाला काही तक्रार असल्यास ते या तक्रारी बॉक्समध्ये टाकू शकतात. 

10 प्रत्येक पेट्रोल पंपमध्ये स्टॉक असणे किंवा बंद आणि खुले असण्यासंदर्भात बोर्ड किंवा नोटीस लावणे बंधनकारक आहे. 

पेट्रोल मालकाविरोधात कठे करावी तक्रार?
पेट्रोल पंप मालक वरील दिलेल्या सुविधा योग्यरित्या पुरवत नसेल किंवा मोफत सुविधांसाठी ग्राहकांकडून पैसे उकळले जात असल्यास, याप्रकरणी सेन्ट्रलाईज्ड पब्लिक ग्रीवेंस रिड्रेस अॅण्ड मॉनिटरिंग सिस्टमच्या पोर्टलवर म्हणजेच pfportal.gov या संकेतस्थळावर तक्रार दाखल करु शकतात. यासोबतच ज्या कंपनीचे पेट्रोल पंप आहे त्याकडेही याप्रकरणी तक्रार दाखल करता येऊ शकते. तसेच संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ई-मेलद्वारे आणि संपर्क क्रमाकावर देखली तक्रार दाखल करु शकतात.