Home गुन्हा पेट्रोल पंपावर शस्त्रनिशी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना सराईतांना जेरबंद केले

पेट्रोल पंपावर शस्त्रनिशी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना सराईतांना जेरबंद केले

0

पुणे : परवेज शेख

स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर
स्वारगेट येथील पेट्रोल पंपावर शस्त्रनिशी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना सराईतांना जेरबंद सदर ठिकाणी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व
कर्मचारी यांना तत्काळ घटनास्थळावर रवाना केले असता सदर इसमांनी त्याचे ताब्यातील वाहन सोडुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचा पाठलाग करुन त्यांना शिताफिने पकडले. त्याची नावे १)अजहर बादशाह शेख, वय १९ वर्षे, रा. चाळ नं. १४२, इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे.२)सुरज सुधीर पाटील, वय २३ वर्षे, रा. अप्पर स्मशानभूमीजवळ, बकुळ हॉलचे शेजारी, बिबवेवाडी,पुणे ३) अंकुश नारायण धांडे, वय ३४ वर्षे, रा. गल्ली नं. ४, जैन मंदिराजवळ, गोकुळनगर, कात्रज, पुणे ४)सुरेंद्र प्रेमदास वंजारी, वय २६ वर्षे, रा.गल्ली नं. १, स्वामी समर्थनगर, गोकुळनगर, कात्रज, पुणे ५)गणेश प्रल्हाद चव्हाण, वय २४ वर्षे, रा. गल्ली नं. ४, जैनमंदिराचे पाठीमागे, गोकुळनगर, कात्रज, पुणे अशी असुन त्यांनी चौकशी दरम्यान वरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने व तयारीने आले बाबत कबुली दिली. त्याचे अंगझडतीत व वाहन झडतीत दोन लोखंडी कोयते, एक्सा बेल्ड, पांढरी रस्सी, मिरची पावडर व गुन्ह्याकरते वेळी वापरलेले वाहन असा एकुण २५.२७०/- रुपये किंमतीचा दरोड्याच्या तयारीचा मुद्देमाल आरोपीकडुन हस्तगत करण्यात आला आहे. त्याचे विरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४२९/२०१९, भा.द.वि. कलम ३९९,४०२, भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३). १३५ प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आलेला आहे.

सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. श्रीकांत तरवडे,
परिमंडळ २, पुणे चे पोलीस उप आयुक्त श्री. शिरीष सरदेशपांडे, स्वारगेट विभाग पुणे चे सहाय्यक
पोलीस आयुक्त श्री. मालोजीराव पाटील, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.
ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक(गुन्हे) श्री. शब्बीर सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप
निरीक्षक समाधान कदम, पोहवा शेख, पोहवा गभाले, पोना थोरात, पोना सुर्यवंशी, पोना कुंभार, पोशि
कांबळे, पोशि साळवे, पोशि दळवी, पोशि बडे, पोशि भोकरे, पोशि चिरमे, पोशि पवार यांनी केलेली आहे.