स्पेन आणि स्विर्त्झलंड यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामा सुरुवातीपासूनच चांगला रंगतदार झाला. कारण या सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच आक्रमक खेळ पाहायला मिळाला. या सामन्याच्या आठव्या मिनिटालाट गोल झाल्याचे पाहायला मिळाले. स्पनेच्या जॉर्डी अल्बाने यावेळी स्विर्त्झलंडवर जोरदाक आक्रमण केले. यावेळी त्याने स्विर्त्झलंडच्या गोल पोस्टमध्ये चेंडू मारण्याचा जोरदार प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये तो यशस्वी ठरणार असेल वाटत होते. पण यावेळी स्विर्त्झलंडच्या डेनिस झाकरियाला हा चेंडू लागला आणि तो त्यांच्याच गोलजाळ्यात गेला. त्यामुळे स्पेनला आठव्या मिनिटालाच १-० अशी आघाडी मिळाली होती. हा गोल कोणत्या नावावर असेल, याबाबत थोडा संभ्रम होता. पण हा गोल झाकारियाचा स्वयंगोल असल्याचे काही वेळातच स्पष्ट करण्यात आले. सामन्याच्या सुरुवातीलाच पिछाडीवर पडल्यावर स्विर्त्झलंडने जोरदार आक्रमणे करायला सुरुवात केली होती. पण यावेळी स्पेनने उत्तम बचावाचा नमुना पेश केला. स्पेनच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात स्विर्त्झलंडचे सर्व आक्रमणाचे प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळेच मध्यंतरापर्यंत स्पेनकडे १-० अशी आघाडी होती.
दुसऱ्या सत्रात मात्र स्पेनच्या बचावपटूंकडून एक मोठी चुक झाली आणि याचा फायदा यावेळी स्विर्त्झलंडचा कर्णधार शकिरीने चांगलाच उचलला. या सामन्याच्या ६८ व्या मिनिटाला शकिरीने यावेळी दमदार गोल केला आणि त्यानंतर स्विर्त्झलंडला स्पेनबरोबर १-१ अशी बरोबीर करता आली. त्यानंतर स्विर्त्झलंडच्या संघात चैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आणि दुसरीकडे स्पेनच्या खेळामध्ये काही चुका होत गेल्या. स्विर्त्झलंडचा संघ आता सामन्यात वर्चस्व राखणार, असे वाटत होते. पण त्यानंतर स्विर्त्झलंडच्या रेमोला त्याच्या चुकीमुळे लाल कार्ड देण्यात आले आणि हा संघासाठी फार मोठा धक्का होता.