पैज जिंकण्यासाठी अवघ्या ९ मिनिटातच अडीच लिटर अर्थात ४५ कप पिला चहा

    - Advertisement -

    पैज जिंकण्यासाठी अवघ्या ९ मिनिटातच अडीच लिटर अर्थात ४५ कप पिला चहा

    पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये एकाने ९ मिनिटांत अडीच लिटर चहा पिऊन हजार रुपयांची पैज जिंकली. 
    सचिन शिंदे असे पैज जिंकणाऱ्याचे नाव असून सचिन रिक्षा ड्राइव्हर म्हणून काम करीत आहेत.

    भिगवण स्टेशनवर दोन मित्रांमध्ये आगळी वेगळी पैज लागली होती. पैज जिंकाणाऱ्या हजार रुपयांचे बक्षीस होते. पैज होती. ती म्हणजे २० मिनिटांत प्यायचा होता ४५ कप म्हणजे अडीच लिटर चहा.

    यात सचिन शिंदे यांनी पैजेचा विडा उचलून शर्यतीनुसार एका मोठ्या भांड्यात चहा घेतला आणि अवघ्या नऊ मिनिटातच अडीच लिटर अर्थात ४५ कप चहा पिला. आणि पैज जिंकून हजार रुपये मिळवले.

    याबद्दल सचिन शिंदे याचे परिसरात कौतुक होत असून या आगळ्या-वेगळ्या पेजची चर्चाही परिसरासह तालुका आणि जिल्ह्यात होत आहे.

    - Advertisement -