पैसा बोलता है! लॉकडाउनमध्येही जॅकलिनने विकत घेतला कोट्यवधींचा आलिशान बंगला

पैसा बोलता है! लॉकडाउनमध्येही जॅकलिनने विकत घेतला कोट्यवधींचा आलिशान बंगला
- Advertisement -


मुंबई- बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी जॅकलिन फर्नांडिस आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे जॅकलिनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर फार काही बोललं जात नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तिने जाणीवपूर्वक आपलं खासगी आयुष्य प्रसारमाध्यमांपासून वेगळं ठेवलं आहे. असं जरी असलं तरी चाहत्यांना मात्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यात कायमच उत्सुकता असते. विशेषत: तिच्या लव्ह लाइफबद्दल.

बंगाली भाषेत सासू- सूनेचं भांडण, बच्चन कुटुंबाची निराळीच तऱ्हा

जॅकलिन आता सिंगल नसून तिच्या आयुष्यात मिस्टर राइटचं आगमन झालं आहे. फक्त एवढंच नाही तर दोघंही एकत्र राहण्याचा विचार करत आहेत. याचंच पहिलं पाऊल म्हणून दोघांनी मिळून मुंबईत एक आलिशान बंगला विकत घेतला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास १७५ कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.


बॉलिवूडचा प्रसिद्ध छायाचित्रकार वीरल भयाननी याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत याचा खुलासा केला. या पोस्टमध्ये त्याने जॅकलिनचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘जॅकलिन फर्नांडिसला तिचं प्रेम सापडलं आहे. ती दक्षिणेतील एका व्यावसायिकासोबत जुहूमधील १७५ कोटींच्या बंगल्यात त्याच्यासोबत रहायला जाणार आहे. आम्ही त्यांच्या आयुष्याच्या या नवीन पर्वासाठी शुभेच्छा देतो.’

Indian Idol 12- शनमुखाला परीक्षकांनी दिलं स्टॅण्डिंग ओवेशन

टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, जॅकलिन कोणत्याही अभिनेत्याला नाही तर व्यावसायिकाला डेट करत आहे. ही व्यक्ती दक्षिणेकडची आहे. इतकेच नाही तर ती लवकरच एक मोठा निर्णय घेणार असल्याचंही बोललं जात आहे. ही बातमी समोर येताच जॅकलिनचे चाहते खूप आनंदी झाले आहेत.


फ्रेंच डिझायनर करतोय बंगल्याचं इंटेरिअर

मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिस बंगल्यात राहायला जाण्यापूर्वी घराच्या इंटेरिअरमध्ये काही बदल करून घेत आहे. याची जबाबदारी तिने एका फ्रेंच इंटेरिअर डिझायनरकडे सोपवली आहे. असं म्हटलं जात आहे की या बंगल्याच्या एकूण रक्कमेची प्राथमिक रक्कम जोडप्याने आधीच दिली असून मुंबईतलं लॉकडाउन संपल्यावर घराच्या कागदपत्रांचं कामही पूर्ण केलं जाईल.





Source link

- Advertisement -