हायलाइट्स:
- अभिनेत्री गहना वशिष्ठचा जामिन झाला मंजूर
- पॉर्न फिल्म प्रकरणी गहना वशिष्ठला झाली होती अटक
- अटकेनंतर ५ महिन्यांनी गहना वशिष्ठला न्यालायचा दिलासा
गहनाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलं आहे की, ‘अखेर ५ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर गहना वशिष्ठला जामिन मिळाला आहे. महाराष्ट्रात घोषित करण्यात आलेल्या कडक लॉकडाउनमुळे न्यायलयाचं कामकाज बंद होतं. मुंबई उच्च न्यायलयातही याची सुनावणी करणं शक्य नव्हतं. गहनाच्या जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्याची सुनावणी सत्र न्यायाकडे सोपवण्यात आली होती. ज्याचा निर्णय अखेर १८ जून रोजी आला आहे.’
दरम्यान याआधी दिंडोशी सत्र न्यायालयानं चार्जशील फाइल न केल्याचं कारण देत गहना वशिष्ठचा जामिन नाकारला होता. गहना वशिष्ट अन्य प्रकरणांमध्ये एप्रिल महिन्यातच जामिन मिळाला होता. मात्र मालवणी पोलीस स्टेशनसंबंधी शेवटच्या एका प्रकरणी जामिन मिळण्यास लॉकडाऊन आणि त्यानंतर न्यायलयीन सुटट्यांमुळे उशीर झाला.
गहना वशिष्ठला तिची सुटका सुनिश्चत करण्यासाठी आता जामिनाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागणार आहेत. ६ फेब्रुवारी २०२१ रोजी पॉर्नोग्राफीशी संबंधीत एक प्रकरणात गहना वशिष्ठसह अन्य आठ लोकांना अटक करण्यात आली होती. आता न्यालायलानं गहनाचा जामिन मंजूर केला असला तरीही तिला न्यायलयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास मात्र परवानगी नाही.