पोप फ्रान्सिस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली – महासंवाद

पोप फ्रान्सिस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली – महासंवाद
- Advertisement -

पोप फ्रान्सिस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांकडून श्रद्धांजली – महासंवाद

मुंबई, दि. २२:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य मान्यवरांनी पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसमोर उभारण्यात आलेल्या स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम पोप फ्रान्सिस यांच्या दुःखद निधनामुळे रद्द  करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांकडून पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

०००

- Advertisement -