देहरादून : देहरादून शहरातील पोलीस स्टेशनच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हीडिओ कोणी पाठवला हे अद्याप समजलेले नाही. मात्र हा प्रकार पोलीसांच्या लक्षात येताच त्यांनी हा ग्रूपमधून लेफ्ट होण्यास सांगितले. त्यासोबत एक नवीन ग्रुप बनवण्यात आला. हा सर्व प्रकार शुक्रवारी समोर आला. त्यावरून पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे.
एका ठाण्याच्या पोलीसकर्मचाऱ्यांनी एक ग्रुप बनवला होता. या ग्रुपचा वापर काही सुचनांचे आदान-प्रदान करण्यासाठी बनवण्यात आला होता. पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या चौक्यांतील पोलिसांचा या ग्रुपमध्ये समावेश होता. दोन दिवसांपूर्वी कोणीतरी या ग्रुपवर एकामागून एक असे अनेक अश्लील व्हिडिओ पाठविले. जेव्हा हे व्हीडिओ पोलिसांच्या नजरेला पाडले तेव्हा ते चकित झाले होते. त्यामुळे महिलांनी हा ग्रुप सोडण्यास सुरुवात केली.
दरम्यान, पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक क्रमांकासह गटातील प्रत्येकाला त्वरित गट सोडून जाण्याची सूचना केली. तसेच एक नवीन व्हॉट्सअॅप ग्रुप बनवण्यासाठी या खासगी क्रमांकावरुन माहिती दिली. तसंच सोशल मीडियावर ज्या कोणी हे केले आहे त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.