Home ताज्या बातम्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले त्यासाठी शोक कवायत

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले त्यासाठी शोक कवायत

0

पुणे : परवेज शेख पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले त्यासाठी शोक कवायत पोलीस स्मृतिदिन संचलन २१ ऑक्टोबर २०१९ शोक कवायत मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना आपले कर्तव्य बजावत असताना,वीरमरण आले, अशा संपुर्ण भारत देशातील सर्व राज्यामधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे स्मृतिला

आज दि.२१ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ०७/३० वा. ते ०९/०० वा.चे दरम्यान पाषाण रोड स्थित महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन
केंद्र,(सीपीआर),पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाचेवतीने पोलीस स्मृतिदिन म्हणुन पाळला जातो.

लडाख येथे दि.२१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी, सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या १० शुर शिपायांच्या तुकडीवर पुर्व तयारीनिशी अचानक हल्ला केला.


त्यावेळी त्या १० शुर वीरांनी शत्रुशी निकराने लढत देऊन देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले. तेव्हापासुन २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाचे वतीने पोलीस स्मृतीदिन म्हणुन पाळला जातो. पोलीस स्मृतीदिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले,त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते.

आज पुणे येथे पाषाण गाव रोडवर महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र,(सीपीआर),पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर सकाळी ०८/०० वा. मा.श्री.सुनिल श्रीधर गोसावी, जिल्हा न्यायाधीश-२ व अपर सत्र न्यायाधीश,पुणे यांनी तसेच मा.डॉ.के.व्यंकटेशम,पोलीस आयुक्त,पुणे शहर, मा.श्री.संदिप बिष्णोई,पोलीस आयुक्त,पिंपरी-चिंचवड,पुणे शहर,मा.श्री.अतुलचंद्र कुलकर्णी,अपर पोलीस महासंचालक,गुन्हे अन्वेषण विभाग,म.राज्य,पुणे, मा.श्री.रितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक बिनतारी संदेश विभाग,पुणे, मा.श्री.सुनिल रामानंद,अपर पोलीस महासंचालक,कारागृह विभाग,म
राज्य,पुणे, मा.डॉ.रविंद्र शिसवे,पोलीस सह आयुक्त,पुणे शहर, मा.डॉ.संजय शिंदे,अपर पोलीस आयुक्त,प्रशासन,पुणे शहर, मा.अशोक मोराळे,अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,पुणे शहर इत्यादि वगैरे वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

दि.१ सप्टेबर २०१८ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत महाराष्ट्रातील १.पो.उप.निरी.छत्रपती किसन चिडे २.सहा.पो.फौज.शांतीलाल चुनीलाल पटेल ३.पो.हवा.राजेंद्र बाजीराव कुडमिथे ४.पो.ना.केवलराम हिरामण येवले ५.
पो.शि.प्रकाश जयराम मेश्राम ६. पो. शि.आगरमन बक्षी रहाटे ७.पो.शि.पुरणशहा प्रतापसिंग दुर्गा ८.पो.शि.किशोर
यशवंत बोराटे ९.पो.शि.लक्ष्मण केशव कोडप १०.योगजी सिताराम हलामी ११.प्रमोद महादेव भोयर १२.अमृत प्रभुदास भदादे १३.राज नारायण गायकवाड १४.भुपेश पांड्रग वालोदे १५.दयानंद तांमाजयाद सहारे १६.संतोष देवीदास चव्हाण १७.शाहदास बाजीराव मडावी १८.नितीन टिळकचंद घोडमारे १९.तौसिफ आरिफ शेख २०.सर्जेराव एकनाथ खराडे असे एकुण २० पोलीस जवान कर्तव्यावर असताना शहिद झाले.

या प्रसंगी शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. शोक कवातीसाठी पु शहर पोलीस आयुक्तालया कडील व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील प्रत्येकी एक तुकडी अशा एकुण दोन तुकडया मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी भाग घेतला. तसेच पोलीस मुख्यालय,पुणे शहरकडील वाद्य-वृंदयांनी भाग घेतला होता. परेड कमांडर सहा.पोलीस आयुक्त,पै.श्री.विजय चौधरी,गुन्हे शाखा,पुणे शहर व सेकंड कमांडर रामकृष्ण गोटमवाड, राखीव पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय,शिवाजीनगर,पुणे शहर यांनी कवायतीचे नेतृत्व केले.

१ सप्टेंबर २०१८ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधील आपले कर्तव्य बजावित असताना,वीर प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी व पोलीस जवान अशा एकुण २९२ जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायतीचे दरम्यान डॉ.शिवाजी पवार,सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा,पुणे शहर व श्री.दिपक हुंबरे,सहा.पोलीस आयुक्त,विशेष
शाखा,पुणे शहर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी त्यामध्ये श्री.सुधाकर आंबेडकर, श्री.पारधी, श्री.रविंद्र बोडखे,
श्री.शेषराव सुर्यवंशी, श्री.विक्रम पाटील, श्री.अरूण वालतुरे, श्री.सतिश पाटील, श्री.राम मांडुरके तसेच पुणे शहर
आयुक्तालय, पुणे ग्रामीण, बिनतारी संदेश विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग,म.राज्य,पुणे, मोटार परिवहन विभाग,पुणे या
विभागातील १०७ वरिष्ठ पोलीस अधिकारी व २३५ कर्मचारी हजर होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्र-संचालन श्री.सिताराम नरके,सेवानिवृत्त,सहा.पो.फौज.एसआरपीएफ,ग्रुप,रामटेकडी,पुणे
यांनी केले. टिप:- पोलीस स्मृतिदिनाचे फोटो https://punepolice.co.in या पुणे पोलीसांचे वेबसाईटवर तसेच फेसबुक,व्टिटर पाठवित आहोत.