पोलीस असल्याची बतावणी करुन खंडणी वसूल करणारी टोळी जेरेबंद

- Advertisement -

प्रतिनिधी :शफिक शेख

प्रतिनिधी : शफिक शेख

पोलीस असल्याची बतावणी करुन खंडणी वसूल करणारी टोळी जेरेबंद
दिनांक 05/08/2019 रोजी नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील हाउस आँफ मोमोस् हाँटेल येथे एक बनावट ग्राहक सदर मोमोस् शाँप मधून मोमोजचे पार्सल घेवून सुमारे संध्याकाळी 20.00 वा गेला. त्यानंतर त्याचे सोबत असलेले इतर साथीदार यांनी सदर मोमोज् मध्ये स्टेपलर ची पीन टाकून इतर तीन बनावट पोलीस त्यातील एक गणवेशात व इतर दोन साधे वेशात त्यांचे जवळ हातकडी व इतर पोलीस भासवणे कामी आवश्यक तत्सम साहीत्य घेवून गेले. सदर ठिकाणी त्यांनी मोमोजचे हाँटलेच्या मालकास गाठले व त्यास बतावणी केली की, आम्ही पोलीस आहोत. आमच्या कडे सदरचा ईसम हा तुमच्या मोमोज मध्ये स्टँपलर ची पीन आहे. तरी त्यामुळे आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहोत. असे सांगून तेथे काम करणा-या एका नोकरास बेड्या घातल्या. तरी सदर मालकास त्यांनी सांगितले की, जर तुम्हाला कारवाई नको असेल तर आम्हाला 20,000/- रु ची मागणी केली. त्यावरुन हाँटेल मालकास त्यांचे वर संशय आल्याने त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशन येथील डी. बी. स्टाफ पो.ना.तावडे सोबत संपर्क साधला. सदरची बातमी मिळताच पोलीस उप निरी. विनोद एस. लभडे हे क्षणाचाही विलंब न करता डी. बी. स्टाफ सह त्वरीत सदर ठिकाणी रवाना झाले.
सदर ठिकाणी पोलीस गाडी बघून त्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला. त्यानंतर डी. बी. पथकाकातील पोलीस उप निरीक्षक विनोद एल लभडे, पोहवा/456 आहीरे, पोना/1219पाटील, पोशि/6597 चडचणकर, पोशि/ 3705 राठोड यांनी त्यांचा पाठलाग करुन सदर ४ संशयीत इसमांना ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांचे ताब्यात एक अग्नीशस्त्र सारखे दिसणारे लायटर, दोन बेड्या, एक पोलीसाचा पुर्ण गणवेश व इतर साहित्य मिळुन आले आहे. त्यांना ताब्यात घेवून त्यांचे विरोधात नौपाडा पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. 239-2019 भादवि कलम 170,171,384,34 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कामगिरी मा.व.पो.नि जाधव सो.पोलीस.नि.धुमाळ सो (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

- Advertisement -