पोलीस क्रिडा स्पर्धा सन २०१९ उद्घाटन समारंभ कार्यक्रम

- Advertisement -

पुणे : परवेज शेख

दि.२९/०८/२०१९ रोजी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे सायंकाळी ०५.०० ते ०६.०० या वेळेत ३७ वी पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा सन २०१९ उद्घाटन समारंभ कार्यक्रम पार पडला.

३७ वी परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धे मध्ये सांघिक व वैयक्तिक क्रिडा प्रकारच्या स्पर्धा होणार असून या स्पर्धेत पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील एकूण २५५ पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन श्री.विरेंद्र मिश्र पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय यांचे हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलन करुन करण्यात आले. स्पर्धे दरम्यान आपली कामगिरी,
खेळातील नैपुण्य दाखवून, उत्कृष्टपणे खेळ करुन जास्तीत जास्त पारितोषिके प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा शब्दात खेळाडूंना मार्गदर्शन करुन त्यांचे
मनोबल वाढविले.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.कल्याणराव विधाते, सहायक पोलीस आयुक्त, मानव संसाधन विभाग, सुत्र संचालन श्री.भिसे,पोलीस उप निरीक्षक व आयोजन रापोउनि श्री अशोक टोके यांनी केले.

- Advertisement -