Home ताज्या बातम्या पोलीस ठाणेमध्ये घरगुती औषधी गोळ्या तयार करून आरोग्यदायी व सांघिक कामगिरी केली आहे.

पोलीस ठाणेमध्ये घरगुती औषधी गोळ्या तयार करून आरोग्यदायी व सांघिक कामगिरी केली आहे.

मुंबई :- शफिक शेख

आज रोजी पायधुनी पोलीस ठाणे टीममधील महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सध्याच्या कोरोना व्हायरस पासून सर्व कार्यरत अधिकारी व अंमलदार यांना ताप, सर्दी, खोकला यापासून सुरक्षित ठेवण्याकरिता हळद, सुंठ, मिरी, लवंग, जेष्ठमध, घंटोदा पावडर, गूळ, तूप अशाचा वापर करून पोलीस ठाणेमध्ये घरगुती औषधी गोळ्या तयार करून आरोग्यदायी व सांघिक कामगिरी केली आहे. केवळ रु 2000/- ची साधने विकत घेऊन अंदाजे 1000 गोळ्या तयार केल्या असून पोलीस ठाणेतील सर्व कार्यरत अधिकारी आणि अंमलदार यांना डबीतून प्रत्येकी 25 गोळ्या देण्यात येत आहे. पोलीस ठाणेतील कार्यरत अधिकारी आणि अंमलदार यांनी त्यांच्या स्वतःचे आणि सहकाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी केलेली सांघिक कामगिरी सर्वाना आपुलकीची भावना व मनोबल उंचावण्यासाठी नक्कीच कौतुकास्पद आहे.
माहितीकरिता सादर,
वपोनि, पायधुनी पोलीस ठाणे, मुंबई.