Home ताज्या बातम्या पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांना बिबवेवाडी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पानवलेल्या डोळ्यांनी दिला निरोप

पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांना बिबवेवाडी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पानवलेल्या डोळ्यांनी दिला निरोप

0

पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांना बिबवेवाडी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पानवलेल्या डोळ्यांनी दिला निरोप

भूषण गरुड
पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांची आता कोंढवा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. बिबवेवाडीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या निरोप समारंभात सत्कार कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे डोळे पानवलेले दिसून आले. बिबवेवाडी पोलिसांच्यावतीने पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत शुभेच्छा दिल्या.

मुरलीधर करपे यांनी आभार व्यक्त करताना आपण छोट्या गुन्ह्यात गुन्हेगारावर हात न उगारता गुन्हेगारास समजावून सांगत कारवाई केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यात कायद्याच्या चाकोरीत राहून काम केले. येथील नागरिक व कर्मचारी यांचे नेहमीच आपुलकीचे कौटुंबिक प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पावसे, पोलीस उपनिरीक्षक काळे, महिला पोलीस उपनिरीक्षक अलका जाधव, पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात, सहाय्यक पोलीस फौजदार महाजन, पोलीस हवलदार चीप्पा,दबडे,पोलीस शिपाई रुपणार,चव्हाण,राख,कुलकर्णी,सोरटे,शिंदे,शेख,कोलते,मोरे,सय्यद,वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते रामविलास माहेश्वरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.