Home शहरे पुणे पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम पी-४ हा कार्यक्रम पुणे पोलीस आयुक्तालयमध्ये साजरा करण्यात आला

पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम पी-४ हा कार्यक्रम पुणे पोलीस आयुक्तालयमध्ये साजरा करण्यात आला

0

पुणे पोलीस व खासगी सुरक्षा रक्षक संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम पी-४ हा कार्यक्रम पुणे पोलीस आयुक्तालयमध्ये साजरा करण्यात आला

पुणे : प्रतिनिधी

पुणे दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी मा. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम (भापोसे) , मा. पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे (भापोसे) , मा. अप्पर पोलीस आयुक्त ( गुन्हे) अशोक मोराळे(भापोसे) मा. अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे (भापोसे), मा. पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग(भापोसे), तसेच भारत शिल्ड फोर्स चे संस्थापक सचिन मोरे व महाराष्ट्र राज्यातील सुरक्षारक्षक सेवा पुरवठादार संस्थेचे मालक आणि चालक कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम पी -४ हा कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक मा.अजित लकडे समन्वय अधिकारी यांनी केले.

माय गेट आणि भारत शील्ड फोर्स च्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .यावेळी आपल्या मनोगतात मा. सचिन मोरे यांनी सांगितले की जगाच्या नकाशावर पुणे हे खूप वेगाने विकासाच्या दिशेने वाढणारे शहर असल्याने आय.टी.कंपन्या, मेट्रो, स्मार्ट सिटी होत असतानाच अद्ययावत अशा प्रशिक्षित सुरक्षारक्षकांना पोलिसांशी मैत्रीचे संबंध तयार करून एक आदर्श सुरक्षा प्रणाली विकसित होणे गरजेचे आहे पी -४ उपक्रमामुळे गुन्ह्याचे प्रमाण रोखण्यास मदत होईल आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनाला मनुष्यबळ गरजेच्या वेळी सुरक्षारक्षक संस्थेच्या वतीने योग्य ती मदत केली जाईल.

तसेच सेवानिवृत्त कर्णल गुरमीत सिंग गिल यांनी या उपक्रमाबाबत पुणे पोलीस दलाची स्तुती केली आणि प्रत्येक सुरक्षारक्षक संस्थेच्या मालकांनी शासनाच्या नियमाप्रमाणे काम करताना जनतेची सेवा करावी आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आम्ही पोलिस प्रशासनाच्या पाठीशी आहोत अशा भावना व्यक्त केल्या. मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे(भापोसे) यांनी आपल्या मार्गदर्शनात खालील सुरक्षारक्षक हे गृहनिर्माण हौसिंग, मॉल, हॉटेल अँड रेस्टॉरंट-पब, सर्व प्रकारची दुकाने, आय टी कंपनी, खाजगी बंगले, बँक-ए.टी.एम, सर्व प्रकारची ऑफिस, हॉस्पिटल, शाळा-कॉलेज, उद्याने, सार्वजनिक पे अँड पार्क पार्किंग, कमर्शियल कॉम्प्लेक्स, ज्वेलरी शॉप, बिग बजार, डी मार्ट, सिनेमा गृह , शासकीय निमशासकीय संस्था , सरकारी कार्यालय, कारखाने, औद्योगिक वसाहत, विविध बाजारपेठ इत्यादी.ठिकाणी काम करतात त्यांनी पोलिसांचे खास दूत म्हणून काम केल्यास मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यावर आळा बसून शकतो आणि जे गुन्हे घडले त्यांच्या तपासाला चालना मिळू शकते. पोलीस स्टेशन आणि सुरक्षारक्षक याचे १२० व्हाट्सॲप ग्रुप तयार करून संपूर्ण शहरात २१ हजाराहून अधिक खाजगी रक्षक जोडण्यात आले आहेत.

मा.पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे(भापोसे) यांनी सर्व मालकांना कायदेशीर बाबी समजावून सांगून या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले.सुरक्षारक्षक संस्थेचे मालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन सर्वांनी मने जिंकली व यापुढे कोणताही मालकांना काहीही गरज भासल्यास आम्ही शंकेचे आणि समस्येचे निराकरण करण्यास सदैव तयार आहोत असे मत व्यक्त केले.
मा.पुणे पोलीस आयुक्त, डॉ. के. व्यंकटेशम (भापोसे) यांनी पुणे पोलीस भारतात कशाप्रकारे स्मार्ट आणि कर्तव्यदक्ष आहे हे उपस्थितांना उदाहरणातून समजावून सांगितले तसेच भविष्यकाळात पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम फॉर या उपक्रमाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर पुणे सुरक्षित करण्यावर भर दिला जाईल आणि शहरातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या करिता नागरिकांची जागरूकता आणि सहकार्याची अपेक्षा त्यावर त्यांनी भर दिला तसेच सर्व कामकाज गतिमान करण्यासाठी ऑनलाईन सुविधा असणार आहे. शहरात कुठेही काही झाल्यास १०० नंबर प्रमाणे ८७७५२८३१०० व्हाट्सॲप नंबर वर माहिती देण्याचे आव्हान केले आहे. जे विनापरवाना सिक्युरिटी एजेन्सी चालवतात अशा चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच सिक्युरिटी एजेन्सीच्या परवान्या करिता पैशांची मागणी होत असल्यास माहिती द्यावी त्यावर कठोर कारवाई केली जाईल,१५ ऑगस्ट नंतर सुरक्षारक्षकाला योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास ५ दिवसात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळेल,सुरक्षारक्षक संस्थेचे मालकाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पुणे गुन्हे शाखेच्या वतीने आभार प्रदर्शन करण्यात आले.