पोलीस हवालदार सचिन खैरनार माणुसकी जपणारे दूत

- Advertisement -

रायगड:-

सर्व जनता कोरोना आजारापासून वाचण्यासाठी धावपळ करीत असताना, रायगड पोलीस दलाचा एक जवान रस्त्यावरील फिरस्ते यांना वाचविण्यात व्यस्त आहे.
सर्व साधारण जनता कोरोना आजार पासून वाचण्यासाठी स्वत:च्या परीने प्रयत्न करीत आहेत. परंतु फिरस्त्याचं काय ? ते स्वत:ला आजारा पासून कस वाचवणार ? मग पोलीस हवालदार सचिन खैरनार यांच्या सारखे माणुसकी जपणारे दूत समोर येतात.
अशीच चर्चा होत आहे ती खैरनार यांची, मागील १० दिवसांपासून स्वत: च्या खिशातील पैसे खर्च करून स्वत: नियमितपणे रस्त्यावरील गरीब जनतेस मास्क, बिस्कीट पुडे वाटप करून आजारा पासून काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत.

सर्व जनता कोरोना आजारापासून वाचण्यासाठी धावपळ करीत असताना, रायगड पोलीस दलाचा एक जवान रस्त्यावरील फिरस्ते यांना…

Posted by Raigad Police on Friday, April 3, 2020

- Advertisement -