प्रकरण वाढवलं जातंय! Indian Idol 12 आणि अमित कुमार वादात आता अभिजीत भट्टाचार्यांची उडी

प्रकरण वाढवलं जातंय! Indian Idol 12 आणि अमित कुमार वादात आता अभिजीत भट्टाचार्यांची उडी
- Advertisement -


हायलाइट्स:

  • अमित कुमार यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाला होता वाद
  • अनेकांनी दर्शवला होता अमित कुमार यांना पाठिंबा
  • अमित यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं अभिजीत भट्टाचार्य यांचं म्हणणं

मुंबई– छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘इंडियन आयडल १२‘ अजूनही वादाच्या भोवऱ्यात आहे. लोकप्रिय गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी कार्यक्रमाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर प्रेक्षक कार्यक्रमावर जोरदार टीका करताना दिसून आले होते. त्यापूर्वीही कार्यक्रमाच्या टीआरपीसाठी निर्माते निरनिराळ्या कल्पना वापरून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं होतं. अमित कुमार यांनी तर कार्यक्रमाची पोलखोल करत त्यांना स्पर्धकांचं खोटं कौतुक करायला सांगण्यात आल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणावर आता बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी महत्वपूर्ण खुलासा केला आहे.

सिनेसृष्टीला मोठा दिलासा; फिल्मसिटीमध्ये शूटिंग होणार सुरू

मागील आठवड्यात अभिजीत यांनी ‘इंडियन आयडल १२’ मध्ये पाहुणे परीक्षक म्हणून हजेरी लावली होती. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीत यांनी हे प्रकरण उगीच वाढवलं जात असल्याचं म्हटलं. अमित यांच्याशी फोनवर बोलल्याचं सांगत अभिजीत म्हणाले, ‘हा कोणताही वाद नाहीच आहे. त्या घटनेनंतर मी स्वतः अमितशी फोनवर बोललो. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी कॅमेरासमोर अशी कोणतीही कबुली दिली नव्हती. त्यांच्या या वक्तव्याचा ना व्हिडीओ आहे ना ऑडिओ. लोकांनी त्यावर विश्वास ठेवला जे वर्तमानपत्रात छापून आलं आणि सोशल मीडियावर वाचलं. ही सगळी गोष्ट मोठी करून दाखवली गेली. हे प्रकरण उगीच वाढवलं गेलं.’

अभिजीत यांनी अमित यांच्या वक्तव्याचा काही बोलल्याचं पुरावा नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे अमित यांच्यानंतर ‘इंडियन आयडल’ च्या पहिल्या सीजनचा विजेता अभिजीत सावंत याने कार्यक्रमावर ताशेरे ओढले होते. शिवाय कार्यक्रमात स्पर्धकांच्या गाण्यांऐवजी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर किंवा दोन स्पर्धकांमधील प्रेमकहाणीवर जास्त लक्ष केंद्रित केलं जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ‘इंडियन आयडल १२’ वर जोरदार टीका झाली होती.

तिसरं लग्नही मोडलं, अब्जाधीश किम कर्दाशियन स्वतःला म्हणते Loser



Source link

- Advertisement -