हायलाइट्स:
- रुग्णालयात दाखल झाल्यानंतर महापौरांच्या प्रकृतीबाबत अफवा
- स्वतः महापौरांनी ट्विटर अकाऊंटवरुन संदेश देत केलं अफवांचे खंडन
- प्रकृती स्थिर असल्याची दिली माहिती
प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने किशोरी पेडणेकर या रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्वतः महापौरांनी त्यांच्या वैयक्तिक व महापौर कार्यालय ट्विटर अकाऊंटवरुन संदेश देत अफवांचे खंडन केलं आहे.
‘कुठलेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी त्या वृत्ताची शहानिशा करून ते वृत्त प्रसारित करावे, अशी मी आशा करते’, असं म्हणत महापौर पेडणेकर यांनी चुकीचं वृत्त देणाऱ्यांना फटकारलं आहे.
‘मी जिवंत आहे आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तसेच थोड्या वेळापूर्वी दाल खिचडीही खाल्ली आहे,’ असंही महापौरांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांना काल रात्रीपासूनच त्रास होत होता. मात्र आज त्यांचा हा त्रास वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या, अशीही माहिती आहे.