प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका मरणोत्तर सन्मानित

- Advertisement -

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आले. भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला आहे. पंतप्रधान भवन येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी प्रणव मुखर्जी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी, कोविंद यांनी भूपेन हजारिका यांचा पुरस्कार त्यांचा मुलगा तेज हजारीका यांना दिला. आणि नानाजी देशमुख यांचा पुरस्कार दीनदयाळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजित सिंग यांना देण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी रोजी ‘भारतरत्न 2019’ पुरस्कार जाहीर करण्यात आले होते . भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी देण्यात येतो. या सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि खेळांचा समावेश आहे.

- Advertisement -