पुणे दि.१६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्वेनगर चौक येथे उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाला खासदार प्रकाश जावडेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, उपायुक्त नितीन उदास आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील यांनी यात्रेबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य गरजू नागरिकांना देण्यासाठी योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहीचवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यात्रेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना लाभ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
०००
- Advertisement -