मुंबई दि ७ : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे राज्याचा नावलौकिक वाढत आहे. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
यावेळी आमदार पराग अळवणी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, लीना प्रभू, राजू रावल तसेच संकुलाचे पदाधिकारी यांच्यासह, प्रशिक्षक, क्रीडापटू उपस्थित होते. प्रारंभी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, रमेश प्रभू हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच या क्रीडा संकुलाची उभारणी केली. या क्रीडा संकुलामधून अनेक होतकरू खेळाडू निर्माण झाले ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा व राज्याचा नावलौकिक वाढविला. क्रीडा संकुलातून असे महान खेळाडू तयार होत आहेत. या खेळाडूंना या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य लाभले आहे.
यावेळी विविध क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंना गौरविण्यात आले.
00000
वृत्त: प्रवीण भुरके (उपसंपादक)